९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघाच्या उपकर्णधाराची धुरा शुभमन गिलकडे असणार आहे. यावेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवला जाणार आहे. १० सप्टेंबर रोजी भारत यूएईविरुद्ध आपला पहिला सामना खेळून या स्पर्धेची सुरवात करणार आहे. तर तर १४ सप्टेंबर रोजी भारता आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या वेळी भारतीय संघाला आशिया कपच्या विजेतेपदाचा मुख्य दावेदार मानले जात आहे. भारतीय संघात प्रतिभावं खेळाडूंचा भरणा आहे. अशातच आता भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आशिया कप स्पर्धेत भारतीय संघातील कोणते खेळाडू हुकमी एक्के ठरतील याबाबत भाकीत वर्तवले आहे. कार्तिकने नेमके कुणाला हुकमी एक्के म्हटले आहे याबाबत आपण माहिती घेऊया.(फोटो-सोशल मीडिया)
आशिया कप स्पर्धेत भारता आपला पहिला सामना यूएईविरुद्ध 10 सप्टेंबरला खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यावेळी जेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हटले जाऊ लागले. अशा परिस्थित स्पर्धेमध्ये कोणते खेळाडू गेम चेंजर ठरू शकतील याबाबत माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने भाकीत वर्तवले आहे.
सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या स्पर्धेत आपला जलवा दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु,दिनेश कार्तिकने या स्टार खेळाडूंना डावलून इतर खेळाडू महत्वाचे मानले आहे.
कार्तिकच्या मते, भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा मुख्य दावेदार असणार आहे. क्रीडारसिक आणि तज्ज्ञांचं मत भारतीय संघ जेतेपद मिळवेल असे म्हटले जात आहे. एखादा मोठा उलटफेर झाला तरंच ही भविष्य खोट ठरू शकतं.
दिनेश कार्तिकने म्हटले आहे की, आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव नाही तर शुबमन गिल चालणार आहे. मोठ्या कालावधीनंतर शुबमन गिल आशिया कप स्पर्धेत पुनरागमन करत आहे. त्याचा फॉर्म पाहता नक्कीच तो मोठी कामगिरी करण्याची शक्यता आहे.
युएईतील खेळपट्ट्या या फिरकीला मदत करणाऱ्या असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जाणारा वरुण चक्रवर्ती या स्पर्धेत हुकुमाचा एक्का ठरण्याची शक्यता असल्याचे कार्तिक म्हणाला आहे.
दिनेश कार्तिकने जितेश शर्मा देखील प्रभावी ठरू शकतो असे म्हटले आहे. खरं तर त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. आहे. पण जितेशला संधी मिळाली तर तो नक्कीच संधीचं सोनं करू शकतो असे कार्तिकने आपले मत मांडले आहे.