रशियातील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये भयावह हल्ला; भारतीय विद्यार्थ्यांवर वार, आरोपी अटकेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (०७ फेब्रुवारी) रशियाच्या बश्कोर्तोस्तान प्रांताची राजधानी उफा येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये घडली आहे. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन तरुण कोणतीही परवानगी न घेता हॉस्टेलच्या परिसरात घुसला. हॉस्टेलच्या परिसरात घुसताच्या त्याने विद्यार्थ्यांवर अचानक चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळून लागले. मात्र या हल्ल्याच काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रशियाच्या स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी पळून जाण्याच्या फिराकमध्ये होता. पोलिसांशी त्याची झटापटही झाली. यामध्ये आरोपीने एका पोलिसावरही हल्ला केला. हल्लेखोरही जखमी झाला असून त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच आरोपीसह इतर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणावर कायदेशीर कारवाई सुरु असून हा हल्ला का करण्यात आला याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच रशियातील भारतीय दूतावासाने घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कझान येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उफाकडे रवाना झाले आहे. दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असून जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक ते उपचार पुरवण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीही लवकर व्हावी असे म्हटले आहे. सध्या जखणींच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
परंतु या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रशियाच्या तपास यंत्रणांनी या हल्ल्याचा तपास सुरु केला आहे. हल्ल्या का झाला, याचा उद्देश काय होता, तसेच हल्लेखोराचा विद्यार्थ्यांची किंवा हॉस्टेलशी काही संबंध होता का या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. लवकरच या घटनेची संपूर्ण माहिती देण्यात येईल असे तपास यंंत्रणांनी म्हटले आहे.
Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (०७ फेब्रुवारी) रशियाच्या बश्कोर्तोस्तान प्रांताची राजधानी उफा येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये घडली आहे.
Ans: रशियाच्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये झालेल्या हल्ल्यात ४ भारतीय विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Ans: हल्ल्याची माहिती मिळताच रशियातील भारतीय दूतावासाने घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कझान येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उफाकडे रवाना झाले आहे. दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना आवश्यक तो उपचार मिळावा यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे.






