कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर 'या' पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीरची भाजी खायला खूप जास्त आवडते. पनीरच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण पनीरची भाजी कायमच कांदा, टोमॅटो आणि इतर मसालेदार पदार्थांचा वापर करून बनवली जाते. पण नेहमीच मसालेदार पदार्थ खायची इच्छा होत नाही. कारण अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढते आणि आरोग्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमीत कमी मसाल्यांचा वापर करून फ्लेवरफूल पनीर भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजीमध्ये १० मिनिटांमध्ये लगेच तयार होते. याशिवाय भाजी बनवताना जास्त मसाले लागत नाही. पनीरची भाजी बनवतमा तुम्ही इतर कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता. यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पनीरपासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चविष्ट भाजी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया फ्लेवरफूल पनीर भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला






