थॅलेसेमिया निर्मूलनासाठी फोर्टिस हेल्थकेअरचा पुढाकार; 'रेड रन'च्या नेतृत्वात जॅकी श्रॉफ यांनी केले "मिशन २०३५" लाँच (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
२०३५ पर्यंत भारताला थॅलेसेमियामुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मिशन २०३५ या शक्तिशाली चळवळीला आज बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी पाठिंबा दर्शवत फोर्टिस हेल्थकेअरशी हातमिळवणी केली. ‘रेड रन टू एंड थॅलेसेमिया’ मध्ये भाग घेण्यासाठी गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये २००० हून अधिक लोक जमले होते. या टाळता येण्याजोग्या पण जीवन बदलणाऱ्या रक्त विकाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी सहभागींनी ५ किलोमीटर धाव घेतली. या चळवळीचा चेहरा बनलेले जॅकी श्रॉफ यांनी या कार्यक्रमात उत्साह भरला.
मिशन २०३५ ला बॉलिवुड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे पाठबळ आहे, जे थॅलेसेमियाबाबत जागरूकतेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाले. त्यांची उपस्थिती व पाठिंब्याने या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवा चळवळीला गती दिली, जेथे थॅलेसेमियाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक, धोरणकर्ते, एनजीओ, रूग्ण सल्लगार समूह आणि अधिकाधिक समुदाय एकत्र आले.
थॅलेसेमिया प्रतिबंध होणारी अनुवांशिक ब्लड डिसऑर्डर आहे, तरीदेखील भारतात दरवर्षी या आजारासह १०,००० ते १५,००० मुले जन्माला येतात. मिशन २०३५ चा जनजागृती वाढवत, लवकर तपासणी व अनुवांशित समुपदेशनाला चालना देत, उपचार उपलब्धता वाढवत आणि नवीन केसेसना प्रतिबंध करण्यासाठी धोरणांमध्ये सुधारणा करण्याला समर्थन देत या वास्तविकतेला बदलण्याचा मनसुबा आहे.
मिशन २०३५ ला पाठिंबा देत श्री. जॅकी श्रॉफ म्हणाले, ”थॅलेसेमियाचे निर्मूलन फक्त वैद्यकीय ध्येय नाही तर नैतिक अनिवार्यता आहे. थॅलेसेमिया आजार मूक संकट आहे, ज्याचा विशेषत: वंचित प्रदेशांमधील अनेक कुटुंबांवर परिणाम होत आहे. लवकर तपासणी आणि जागरूकता यामुळे अनेक मुलांना आयुष्यभराचा त्रास दूर करता येऊ शकतो. मी मिशन २०३५ उपक्रमामधील फोर्टिस हेल्थकेअरला संपूर्ण पाठिंबा देतो, ज्यामुळे भावी पिढ्यांसाठी आरोग्यदायी भविष्य घडवण्यास मदत होईल. सहयोगाने आपण दूरपर्यंत संदेश पोहोचवला पाहिजे, कारण जागरूकतेसह प्रतिबंधाची सुरूवात होते.”
फोर्टिस हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशुतोष रघुवंशी म्हणाले, ”मिशन २०३५ प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि थॅलेसेमिया-मुक्त भारताप्रती आमची कटिबद्धता आहे. थॅलेसेमिया आजीवन संकट आहे, ज्याचा मुलांसोबत संपूर्ण कुटुंबावर शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या परिणाम होतो. तरीदेखील हा वेळेवर तपासणी आणि अनुवांशिक समुपदेशानासह पूर्णपणे प्रतिबंध होणारा आजार आहे. गर्भधारणेदरम्यान एक योग्य निर्णय आजीवन त्रासाला दूर करू शकतो.
आमचा उपक्रम भारतातील कोणतेही मूल थॅलेसेमियासह जन्माला येणार नाही याची खात्री घेण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सहयोगात्मक प्रयत्न, जागरूकता आणि धोरण पाठिंब्यासह आपण या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणू शकतो. फोर्टिसमध्ये आमचा विश्वास आहे की, आरोग्यसेवा प्रतिबंधासह केअरबाबत आहे. आज लाँच करण्यात आलेल्या मिशन २०३५ सह आम्ही आरोग्यसेवा, धोरणकर्ते आणि समुदाय यांच्या संघटित प्रयत्नांची सुरूवात करत आहोत. सहयोगाने, आपण आरोग्यदायी, प्रबळ भारत घडवू शकतो.”
फोर्टिस हेल्थकेअर बहुआयामी दृष्टिकोनाच्या माध्यमातून थॅलेसेमियाविरोधातील लढ्यामध्ये अग्रस्थानी आहे, ज्यामध्ये वैद्यकीय सर्वोत्तमता, जनजागृती आणि समुदाय आऊटरिचचा समावेश आहे. स्वत:ची प्रगत डायग्नोस्टिक शाखा अॅग्लीअस डायग्नोस्टिक्स आणि विशेषीकृत हेमॅटोलॉजी विभागांचे पाठबळ असलेली फोर्टिस हेल्थकेअर तपासणी, अनुवांशिक समुपदेशन, बोन मॅरो प्रत्यारोपण आणि उदयोन्मुख जीन थेरपीजची उपलब्धता देते.
शालेय व कॉलेज प्रोग्राम्स, एनजीओसोबत सहयोग आणि सरकारी संस्थांसोबतच्या भागीदारीच्या माध्यमातून फोर्टिस प्रतिबंधात्मक केअरमध्ये अग्रस्थानी आहे. मिशन २०३५ सह फोर्टिस थॅलेसेमियावर उपचार करण्याप्रती, तसेच आजाराबाबत संपूर्ण माहिती देण्यासाठी काम करण्याप्रती, प्रतिबंध, लवकर हस्तक्षेप आणि योग्य निर्णय घेण्यामध्ये खोलवर सामावलेली आरोग्यसेवा इकोसिस्टम घडवण्याप्रती कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. भारतातील थॅलेसेमियाचे निर्मूलन करण्यासाठी फोर्टिसचा दृष्टिकोन बहुआयामी असेल, जेथे जागरूकता, लवकर तपासणी आणि उपचाराच्या माध्यमातून प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.