फोटो सौजन्य: Freepik
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा एक भाग असलेल्या गोदरेज आणि बाइसच्या लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज बिझनेसने अलीकडेच ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ सर्वेक्षण केले. यामध्ये डिलिव्हरी हाताळणीच्या संदर्भात मानवी वर्तणुकीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणात असे आढळून आले की, प्रत्येक पाच Gen X उत्तरदात्यांपैकी जवळजवळ तीन जण (59%) एखाद्या गोष्टीची डिलिव्हरी त्यांच्या गैरहजेरीत घेण्यासाठी शेजाऱ्यांवर अवलंबून असतात, जे विश्वसनीय स्थानिक कनेक्शन दर्शविते. ही पिढी सामाजिक संबंधांमधील सुरक्षितता आणि विश्वासार्हतेला महत्त्व देते. या तुलनेत केवळ 52% मिलेनियल्स डिलिव्हरीसाठी त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून असतात. जास्त मिलेनियल्सचा कल तंत्रज्ञानाकडे असल्याचा बदल यातून दिसून येतो. डिलिव्हरी लॉजिस्टिक्स हाताळण्यासाठी डिजिटल टूल्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरण्याकडे मिलेनियल्सचा अधिक कल आहे.
हे देखील वाचा: अदानी समुह आणखी एक कंपनी खरेदी करणार; 4101 कोटींमध्ये झालीये डील!
जसजसे हे युग प्रगत होत आहे, तसतशी घराच्या सुरक्षिततेची गरजही वाढते. लॉक्स बाय गोदरेज अँड बाइसच्या नावीन्यपूर्ण सुरक्षा प्रणालीद्वारे या गरजा त्याच्या अत्याधुनिक डिजिटल लॉकसह पूर्ण करतात. यात सुरक्षितता आणि सोय अशा दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. कीलेस एंट्री, रिमोट ॲक्सेस आणि रिअल-टाइम नोटिफिकेशन्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह, हे डिजिटल लॉक Gen X आणि मिलेनियल्स या दोन्हींच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
हे देखील वाचा: घरांच्या किंमती वाढणार की घटणार? पाहा… काय सांगतोय रिअल इस्टेट क्षेत्रातील अहवाल!
या निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज आणि बाइसचे लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सीस्टम व्यवसायाचे व्यवसायप्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्य याची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या पिढ्या त्यांच्या डिलिव्हरीचे व्यवस्थापन कसे करतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आमचा अलीकडील अभ्यास जनरेशन एक्स आणि मिलेनियन्समधील डिलिव्हरी वेळी त्यांचे असलेले अवलंबित्व यातील स्पष्ट फरक दर्शवितो. जनरेशन एक्स त्यांच्या शेजाऱ्यांवर अवलंबून असण्याची शक्यता जास्त आहे.”
सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट होम उपकरणांचा अवलंब करण्यासंबंधी मानवी वर्तन समजून घेणे हे ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या पाच शहरांमधील 2,000 लोकांमध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.