फोटो सौजन्य - सोशल मिडिया
क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जाणार भारताचा स्टार किंग कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरामध्येच आहेत. सोशल मिडियावर त्याची फॅनफोलोइंग पाहायला मिळते, त्याचबरोबर सर्व सामन्यच नाही तर अनेक मोठे सेलिब्रेटी देखील त्याला खेळताना त्याचबरोबर त्याची पर्सनॅलिटी पसंत करतात. विराट कोहली सोशल मिडियावर फार काही सक्रिय नसतो. त्याचबरोबर तो त्याच्या चाहत्यांना खेळतानाच विशेषत: पाहायला मिळतो.
आपण पाहतो प्रत्येक क्षेत्राचा एक वेगळा राजा असतो. अशाच प्रकारे तुम्ही मिस्टर बीस्टबद्दल ऐकले असेलच. त्यांना युट्यूब जगतातील मुकुट नसलेला राजा म्हणून ओळखले जाते. लोक त्याला जगातील सर्वात मोठा युट्यूबर देखील म्हणतात. हा प्रसिद्ध अमेरिकन युट्यूबर त्याच्या व्हिडिओंमध्ये किंग कोहलीला दाखवू इच्छितो. विराट कोहलीला त्याने दुसऱ्यांदा सार्वजनिकपणे विनंती केली आहे. तो म्हणाला, “मी तुमच्यासोबत चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे.”
13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक
मिस्टर बीस्टचे खरे नाव जेम्स स्टीफन डोनाल्डसन आहे. तो त्याच्या आव्हान-आधारित व्हिडिओंसाठी ओळखला जातो. अलीकडेच, भारतीय वृत्तवाहिनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, त्याने कोहलीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ही इच्छा त्याने सार्वजनिकपणे व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, त्याने एक्स वर पोस्ट केले होते, “विराट कोहली, मी तुला एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे, कसा तरी.” ती पोस्ट व्हायरल झाली.
मिस्टर बीस्ट म्हणाले, “अरे विराट कोहली, मला तुमच्यासोबत एक चित्रपट बनवायचा आहे.” किंग कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि सर्व क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता आहे. कदाचित म्हणूनच मिस्टर बीस्ट त्याच्यासोबत व्हिडिओ बनवण्यास उत्सुक आहेत. तथापि, कोहलीकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
@imVkohli Hey! Anyway I could get you in a video? 👀 — MrBeast (@MrBeast) April 23, 2025
मिस्टर बीस्ट हा भारतातील या शोचा खूप मोठा चाहता आहे आणि मुलाखतींमध्ये त्याने कबूल केले की भारत हा त्याच्या सर्वात मोठ्या प्रेक्षकांपैकी एक आहे. मिस्टर बीस्ट भारतीय प्रेक्षकांबद्दल म्हणाले, “मला तुम्ही खूप आवडतात. मला लवकरच तुमच्यासोबत परत यायचे आहे. अरे, विराट कोहली, जर तुम्ही हे पाहत असाल तर मी तुमच्यासोबत एक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही नेहमीच उत्तम राहिला आहात. बहुतेक लोकांना माहित नाही की भारत हा आपल्या सर्वात मोठ्या प्रेक्षकांपैकी एक आहे, म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे.”






