Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

Food Inflation : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसू लागली आहे. कांदा, खाद्यतेल, साखर आणि विविध डाळींच्या किमती अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम स्वयंपाकघरावरही झाला आहे. ऐन सणासुदीच्यावेळी सामान्यांचं बजेट पूर्णपणे बिघडणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 01:05 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या,
  • अचानक का वाढली महागाई?
  • ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार
Food Inflation : देशभरात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. यासगळ्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. जागतिक स्तरावरील राजकीय परिस्थिती आणि त्याचा झालेला इंधनावरील परिणाम पाहता मागील काही महिने सिलेंडरपासून पेट्रोल डिझेलच्या किमती कडाडल्या होत्या. त्यानंतर आता ही लाट सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. गेल्या आठवड्यात अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत. साखर, कांदे, टोमॅटो आणि तेल यांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यानंतर आता डाळींच्या दरातही मोठी वाढ झाली असून, त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महागाईचा विळखा कमी करण्यासाठी सरकार सतर्क झालं आहे. पण तरीही नेमकी परिस्थिती काय आहे? ( Food Inflation ) 

TikTok Privacy Fine : टिकटॉकला मोठा दणका! भरावा लागणार 3300 कोटींचा दंड, लहान मुलांच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड? प्रकरण काय?

साखरेच्या किमती कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न?

गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात ७ रुपयांनी आणि गेल्या महिन्यात १७ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे, परिणामी साखर आता ७० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. साखरेच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. साखरेचा पुरवठा बाजारात वाढवा यासाठी सरकार विविध पद्धतींचा वापर करत आहे. यासाठी सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर बाजारातील साठेबाजी हा प्रकार रोखण्यासाठी मर्यादादेखील घालून दिली आहे. तिसरे आणि महत्त्वाची बाब म्हणजे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी साखर कारखान्यांना निर्देश दिले आहेत. १५ ऑक्टोबरपासून लवकर गाळप सुरू करण्यास देखील सांगितलं आहे.

यासगळ्यात वाढते साखरेचे दर या सगळ्यास कारणीभूत इथेनॉल असल्याचं टिकाकारांचं मत आहे. पण सरकारने यासगळ्या परिस्थितीला स्पष्टपणे नकार दिला आहे. सरकारच्या मते, साखरेच्या दरातील वाढ ही साठेबाजी आणि साठेबाजीच्या भीतीमुळे झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कांद्याचे भाव का वाढताहेत?

२१ ऑगस्ट रोजी कांद्यांचा भाव सरासरी ४०.७९ रुपये किलो इतका होता. एका आठवड्यापूर्वी हाच भाव ३६.५६ रुपयांवर आणि एका महिन्यापूर्वी ३४.८७ रुपयांवर होता. याचा अर्थ कांद्याच्या दरात ₹४ ते ५ प्रति किलोने वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर भावात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचं आकडेवारीत दिसून येत आहे. या भाववाढीचे मुख्य कारण म्हणजे नवीन खरीप कांद्याच्या पिकामध्ये आलेला व्यत्यय असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मान्सूनला झालेला विलंब आणि खरीप कांद्याच्या पेरणीवरही झालेला परिणाम या सगळ्याचा परिणाम कांद्यांच्या दरावर होत आहे. भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आपल्या बफर साठ्यातील कांद्याची विक्री करत आहे.

डाळींचे दरही कडाडलेत?

गेल्या महिन्याभरात तूर, मूग, उडीद आणि हरभरा यांसारख्या डाळींच्या दरात देखील वाढ दिसून आली आहेत. तब्बल १ ते २ रुपयांनी वाढ सांगण्यात आली असली तरीही ती सणासुदीच्या काळात फार मोठी वाढ असल्याचं समोर येत आहे. या दरवाढीमागे देखील मान्सूनला कारणीभूत मानलं जात आहे. आकडेवारीनुसार, यावर्षी डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५,००० हेक्टरने कमी आहे. तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र १.६९ लाख हेक्टरने कमी आहे. अशा परिस्थितीत, कमी पावसामुळे डाळींचे भाव आणखी वाढू शकतात.

तेलांच्या किमतीवरही मोठा परिणाम

इतर गोष्टींच्या किमती कडडल्या आहेत तर मी तेल या सगळ्यात कसं मागे राहील? आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमती या सध्या २० महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचल्या आहेत. इंडोनेशिया हा पाम तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. पण तेथील सुरु असलेली दुष्काळी परिस्थिती तेलाच्या किमती वाढण्यास कराणीभूत ठरत आहे. पाम तेल हे सर्वाधिक वापरले जाणारे खाद्यतेल आहे. भारत या तेलाची आयात करतो आणि सध्या आयातीत घट झाल्यामुळे त्याच्या किमती वाढत आहेत.

यासगळ्यासोबत रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध हे जागतिक स्तरावरील देशातील प्रत्येक समस्येचं कारणं ठरत आहेत. भारताच्या शुद्ध तेलाच्या आयातीवर परिणाम झाल्याने सूर्यफूल तेलाची आयातही मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. इतकेच नव्हे तर, जागतिक बाजारातही खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.

RBI FD Rules 2026: FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI ने बदलले बँक डिपॉझिटचे नियम; 1 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू

Web Title: Food inflation sudden rise prices of onion oil sugar dal skyrocket marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Business News
  • cooking oil
  • ethanol
  • Indian Inflation
  • Inflation
  • Inflation Increases
  • Inflation Rate In India
  • Marathi News
  • onion
  • rising inflation
  • Sugar

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.