(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मुंबई उच्च न्यायालयाने डाबर इंडिया लिमिटेडला त्यांच्या कडुलिंबावर आधारित टूथपेस्टच्या पॅकेजिंग आणि लेबल्सवर ‘नीम’ हा शब्द एक प्रमुख ट्रेडमार्क आणि मुख्य ब्रँड ओळख म्हणून वापरण्यापासून रोखल लावली आहे. ज्योती लॅब्स लिमिटेडने जी स्वतःला विको किंवा कडुलिंबावर आधारित उत्पादनांशी संबंधित कंपनी असल्याचा दावा करते तिने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघनाच्या दाव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांनी अंतरिम अर्ज मंजूर करताना स्पष्ट केले की, डाबरला ‘नीम’ हा शब्द वर्णनात्मक संज्ञा म्हणून वापरण्यास मनाई नाही, परंतु लेबलवर प्राथमिक ब्रँडिंग म्हणून त्याचा वापर करता येणार नाही. डाबरला अपील करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
ज्योती लॅब्सने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला कारण डाबर इंडियाने त्यांच्या नीम टूथपेस्टच्या पॅकेजिंग आणि लेबलवर ‘नीम’ हा शब्द ठळकपणे वापरला होता, जो त्यांच्या ब्रँड आयडेंटिशी मिळताजुळता होता.
ज्योती लॅब्सने असा युक्तिवाद केला की, नीमचा मुख्य ब्रँड ओळख म्हणून वापर केल्याने मार्केटींग करणाऱ्यांमध्ये उत्पादनाच्या ओळखीबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. यामुळे त्यांच्या व्यावसायिक आणि लेबलिंग हक्कांना हानी पोहोचत होती.
ज्योती लॅब्स ही देशातील एक सुप्रसिद्ध FMCG कंपनी आहे. याची स्थापना १९८३ मध्ये केरळमधील त्रिशूर येथे एम. के. रामचन्द्रन यांनी केली. ही कंपनी उजालासारखी कपड्यांची काळजी घेणारी उत्पादने, एक्सो आणि प्रिल सारखी डिशवॉशर्स, मॅक्सोसारखी घरगुती कीटकनाशके आणि मार्गोसारखी वैयक्तिक काळजी घेणारी उत्पादने यांसारखे अनेक ब्रँड्स विकते. नीम-आधारित उत्पादनांचा मोठा इतिहास आहे आणि ती त्यांच्या ब्रँडिंगचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहेत. यापूर्वी, १९२० च्या दशकात कलकत्ता केमिकल कंपनीने ‘नीम’ ट्रेडमार्क वापरला होता.
न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी डाबरला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या काळात, ‘नीम’ हा एक सामान्य शब्द असून पॅकेजिंगवर डाबरचा लोगो स्पष्टपणे दिसत आहे, ज्यामुळे ते इतर ब्रँड्सपेक्षा वेगळे ठरते, असा युक्तिवाद करून कंपनी अपील करू शकते. अपीलमध्ये डाबरला दिलासा न मिळाल्यास, त्यांना पॅकेजिंगवरून ‘नीम’ हा शब्द काढून टाकावा लागेल, एकतर मुख्य ब्रँड नावासह किंवा मोठ्या फॉन्टमधील लोगोसह त्यांना वेगळेपणा दाखवावा लागेल.



