दुचाकीपासून प्रॉपर्टी लोनपर्यंत सर्व गरजांसाठी कर्ज; होम क्रेडिट इंडियाने सुरू केली #LoanMilega मोहीम
भारतात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना कुटुंबात त्यावर मोठी चर्चा होते. घरातील प्रत्येक सदस्य आपले मत मांडतो, सल्ले देतो आणि अनेकदा घरातील वातावरण एखाद्या ‘कोर्टरूम ड्रामा’सारखे बनते. याच वास्तवाला हलक्या-फुलक्या आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मोहिमेत करण्यात आला आहे.
#LoanMilega मोहिमेत चार वेगवेगळ्या कौटुंबिक परिस्थिती दाखवण्यात आल्या आहेत.
एका तरुणाला स्वतःची दुचाकी खरेदी करण्यासाठी घरच्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते.
एका नोकरदार महिलेला जुना एअर कंडिशनर बदलण्याच्या निर्णयावर भावनिक विरोधाचा सामना करावा लागतो.
लग्नाआधी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या तरुणाला कुटुंबाकडून अनेक प्रश्न विचारले जातात.
एका आईला कौटुंबिक व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मालमत्ता गहाण ठेवण्याच्या निर्णयावर नातेवाईकांच्या आक्षेपांना सामोरे जावे लागते.
या प्रत्येक कथेत सुरुवातीला कौटुंबिक नाट्य रंगते; मात्र शेवटी होम क्रेडिटच्या माध्यमातून सहज आणि जलद कर्ज मंजूर होते. त्यानंतर कुटुंबातील आक्षेप दूर होतात आणि संबंधित व्यक्तींची स्वप्ने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो.
होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग अँड पीपल ऑफिसर आशिष तिवारी यांनी सांगितले की, अनेकदा आर्थिक निर्णयांबाबत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबामध्ये संकोच असतो. #LoanMilega मोहिमेद्वारे हा सार्वत्रिक भारतीय अनुभव मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. जबाबदार पद्धतीने मिळणारे कर्ज लोकांना त्यांच्या ध्येयांच्या दिशेने आत्मविश्वासाने पावले उचलण्यास मदत करू शकते, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
या मोहिमेद्वारे होम क्रेडिट इंडियाने स्वतःला सर्व प्रकारच्या कर्जसुविधा देणारा पूर्ण-पोर्टफोलिओ फायनान्शियल एनेबलर म्हणून अधिक मजबूत केले आहे. कंपनीकडून ग्राहकांना खालील कर्जपर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत:
पर्सनल लोन (Personal Loan)
टू-व्हीलर लोन (Two-Wheeler Loan)
कंझ्युमर ड्युरेबल लोन (Consumer Durable Loan)
लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (Loan Against Property – LAP)
#LoanMilega मोहिमेच्या माध्यमातून होम क्रेडिट इंडियाने भारतीय कुटुंबांच्या भावविश्वाला स्पर्श करत, गरज कोणतीही असो, योग्य वेळी सहज कर्ज मिळू शकते, हा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण, हजारोंनी झाले भाव कमी; खरेदीपूर्वी जाणून घ्या दर






