
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सरकार चक्क तुमच्या या प्रयत्नांना पाठिंबा आणि अनुदानही देत आहे. देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये सरकारची अशी इच्छा आहे की तुमची वीज तुम्ही तयार करुन वापरावी. त्यानंतर जर तुमच्याकडे काही अतिरिक्त वीज असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकार पैसेही देणार आहे. सरकार देशभरात सौर पॅनेल बसवण्यासही पाठिंबा देत आहे.
जर तुम्ही तुमच्या घरी सौर पॅनेल बसवले, तर तुमचे वीज बिल शून्य होईल. इतकेच नाही, तर तुम्ही निर्माण केलेली अतिरिक्त वीज सरकारला विकूही शकता. या उद्देशासाठी केंद्र सरकार पीएम सूर्य घर योजना देखील चालवत आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही सौर पॅनेल बसवून अनुदानाचा लाभ घेऊ शकता आणि ते बसवण्याचा खर्च कमी करू शकता. नेमकी काय आहे योजना? तुम्हाला मिळावी यासाठी काय करावं लागेल?
पीएम सूर्य घर योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
‘रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा’ यावर जा.
तुमचे राज्य आणि विद्युत वितरण कंपनी निवडा.
आता तुमच्या वीज कनेक्शनशी संबंधित माहिती भरा.
आता तुमचा विक्रेता निवडा. सोलर पॅनेल बसवल्यानंतर, DISCOM त्यांची तपासणी आणि पडताळणी करेल.
त्यानंतर, नेट मीटर आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, अनुदान तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल.
सरकार 1 kW साठी ₹30,000, 2 kW साठी ₹60,000 आणि 3 kW किंवा अधिकसाठी ₹78,000 चे अनुदान देते.
हा लाभ घेण्यासाठी, तुमच्या घरी ग्रीड-कनेक्टेड वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
सौर पॅनेल बसवण्यासाठी तुमच्याकडे छतावर योग्य जागा असणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत, ही प्रणाली एका विक्रेत्याकडून बसवली जाणे आवश्यक आहे.
सौर प्रणाली बसवून DISCOM कडून तिची पडताळणी झाल्यानंतर अनुदानाची प्रक्रिया पूर्ण होते.
India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?