Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Life Insurance Guide: केवळ गरजेचा नाही तर आर्थिक सुरक्षाकवच! वय आणि गरजेनुसार कसा असावा तुमचा जीवन विमा? पाहा सविस्तर

आजही भारतात विमा संरक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. ८० टक्क्यांहून अधिक कुटुंबांकडे जीवन विमा संरक्षण नाही. IRDAI च्या २०२४-२५ वार्षिक अहवालानुसार, विमा उद्योगाने ₹८.८६ लाख कोटींचे प्रीमियम उत्पन्न नोंदवत ६.७३ टक्के वाढ साधली असली तरी, प्रत्यक्ष नवीन विमा खरेदीचे प्रमाणे सुमारे २.७ टक्क्यांपर्यंत घसरले आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 01, 2026 | 07:38 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

योग्य हेतू असूनही जीवन विमा हा अजूनही अनेकांसाठी टाळला जाणारा किंवा सर्वाधिक दुर्लक्षित आर्थिक गरजांपैकी एक आहे. याचा प्रत्यय दरवर्षी सरकारी संस्थांकडून जाहीर होणाऱ्या विमा घनता (Insurance Density) आणि विमा प्रवेश (Insurance Penetration) आकडेवारीतून स्पष्टपणे येतो. भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षेकडे वेगाने वाटचाल करत असताना, एक महत्त्वाचा पाया अजूनही कमकुवत आहे — नागरिकांची आर्थिक सुरक्षितता. झपाट्याने आर्थिक प्रगती होत असली तरी, जीवनातील अनिश्चित प्रसंगांपासून व्यक्ती आणि कुटुंबांचे संरक्षण करणारी सक्षम सामाजिक सुरक्षा व्यवस्था देशात अजूनही पुरेशी विकसित झालेली नाही. भारताला खऱ्या अर्थाने आर्थिक महासत्ता बनायचे असेल, तर विकासाबरोबर आर्थिक सुरक्षितताही तितकीच आवश्यक आहे. जीवन विमा हा या सुरक्षाकवचाची महत्त्वाची भूमिका निभावू शकतो — मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीयाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन India First Insurance चे सीएफओ केदार पत्की यांनी दिलं आहे.

आजही भारतात विमा संरक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. ८० टक्क्यांहून अधिक कुटुंबांकडे जीवन विमा संरक्षण नाही. IRDAI च्या २०२४-२५ वार्षिक अहवालानुसार, विमा उद्योगाने ₹८.८६ लाख कोटींचे प्रीमियम उत्पन्न नोंदवत ६.७३ टक्के वाढ साधली असली तरी, प्रत्यक्ष नवीन विमा खरेदीचे प्रमाणे सुमारे २.७ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. हे आकडे संरक्षण आणि विम्याचे प्रत्यक्ष खरेदीचे प्रमाण यांतील मोठी दरी दर्शवतात. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे “विशिष्ट जीवन टप्प्यावर पोहोचल्यानंतरच जीवन विमा आवश्यक असतो” ही सर्वसाधारण धारणा. प्रत्यक्षात मात्र, जीवन विमा प्रत्येक वयात आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे देतो.

तरुण वयात घेतलेला विमा अधिक फायदेशीर

करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील अनेक तरुण व्यावसायिक जीवन विम्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांना वाटते की त्यांच्यावर फारशा जबाबदाऱ्या नाहीत किंवा आश्रितही नाहीत. पण प्रत्यक्षात, कमी वयात जीवन विमा घेतल्यास दीर्घकालीन संरक्षण अत्यंत कमी प्रीमियममध्ये मिळवण्याची संधी मिळते. साधारणपणे तरुण वयात आरोग्य अधिक चांगले असते, त्यामुळे जोखीम कमी आणि प्रीमियमही स्वस्त असतो. लवकर विमा घेतल्यास आयुष्यभरासाठी कमी प्रीमियम निश्चित करून ठेवता येतो. नंतर जबाबदाऱ्या आणि जीवनातील बांधिलकी वाढत गेल्यावर कव्हरही वाढवता येते. विशेषतः शहरी जीवनात राहणीमान, निवास, जीवनशैली आणि इतर खर्च वयानुसार वाढत जातात. त्यामुळे कमी दरात जीवन विमा लवकर निश्चित करणे अधिक शहाणपणाचे ठरते. यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्चात बचत होते आणि सातत्यपूर्ण आर्थिक संरक्षणही मिळते.

स्थिर्यै देणारी तिशी – कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण

तिशीत प्रवेश करताना जीवनात अनेक जबाबदाऱ्या वाढू लागतात — विवाह, घर खरेदी आणि पालकत्व यामुळे खर्चाचे स्वरूप बदलते. या टप्प्यावर जीवन विमा हा केवळ संरक्षण नव्हे, तर दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचे प्रभावी साधन ठरू शकतो. तो कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसह भविष्यातील संपत्ती निर्मितीलाही मदत करतो. पण वास्तव असे आहे की या वयात अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण असतो. आरोग्यसेवेचा वाढता खर्च आणि जीवनशैलीशी संबंधित वाढते धोके लक्षात घेता, विमा संरक्षण वाढवणे, गंभीर आजारांचे (क्रिटीकल इलनेस) कव्हर घेणे आणि बदलत्या जीवन उद्दिष्टांनुसार विमा पोर्टफोलिओचा नियमित आढावा घेणे अत्यावश्यक ठरते.

जबाबदाऱ्यांनी भरलेली चाळीशी – अधिक व्यापक संरक्षण

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या २०२५ च्या सर्वेक्षणानुसार, २५.६ टक्के लोकांनी हृदयविकारासारख्या आजारांची नोंद केली, तर जुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीत हे प्रमाण १६.७ टक्के होते. या सर्वेक्षणातून असेही स्पष्ट झाले की ४५ वर्षांवरील लोकांमध्ये जीवनशैलीजन्य आजार अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे चाळिशीत करिअर सर्वोच्च टप्प्यावर असले तरी आरोग्याशी संबंधित धोकेही वाढतात. याच काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च, विशिष्ट जीवनशैली टिकवणे आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी अशा अनेक आर्थिक जबाबदाऱ्या शिगेला पोहोचतात. त्याचबरोबर निवृत्ती नियोजनाकडेही लक्ष द्यावे लागते. म्हणूनच चाळीशी हा संपूर्ण आर्थिक नियोजन आणि संरक्षण व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचा टप्पा आहे. या वयात जीवन विमा गुंतवणुकीत विविधता आणणे आवश्यक असते. टर्म प्लॅनसोबत अॅन्युइटी आधारित पेन्शन योजना आणि बचतप्रधान मनी-बॅक योजना यांचाही विचार करणे गरजेचे ठरते, जेणेकरून भविष्यातील सर्व अनिश्चित परिस्थितींना तोंड देता येईल.

धोरणात्मक पन्नाशी – निवृत्ती आणि वारशाची तयारी

या टप्प्यावर आपण सक्रिय उत्पन्नाच्या आयुष्याच्या शेवटाकडे पोहोचत असतो. त्यामुळे केवळ संपत्ती साठवण्यापुरते गुंतवणूक धोरण मर्यादित ठेवणे परवडणारे नसते. निवृत्तीनंतर नियमित आणि अंदाजे उत्पन्न मिळणे अत्यावश्यक असते. तसेच, छंद जोपासणे किंवा परदेश प्रवासासारखी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्यही आवश्यक असते. निवृत्ती निधीचे सक्रिय व्यवस्थापन करण्याची तयारी आणि क्षमता किती आहे यानुसार त्वरित अॅन्युइटी योजना निवडता येतात आणि उर्वरित निधी इतर आर्थिक साधनांत वाढीसाठी गुंतवता येतो. सिंगल आणि लिमिटेड प्रीमियम पॉलिसी, उदाहरणार्थ हमी उत्पन्न योजना, तसेच टर्म प्लॅन यांचे संयोजन आर्थिक सुरक्षिततेसाठी आदर्श ठरू शकते.

कटू सत्य

परंपरागत शहाणपण आपल्याला कुटुंबाची सुरक्षितता, भविष्यातील उद्दिष्टे, निवृत्तीचे आयुष्य आणि वारसा यांचे संरक्षण करण्याचे मार्ग शोधायला सांगते. पण प्रत्यक्षात आपण “आज आणि आत्ता” यापलीकडे फारसा विचार करत नाही आणि आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सोपी पावले उचलत नाही. पण इंग्रजीत म्हणतात तसे, इट इज नेव्हर टू लेट. पर्याय अनेक असू शकतात, पण त्यातील योग्य पर्याय निवडून त्यावर कृती करणे हेच महत्त्वाचे आहे. जीवन विमा हा उत्पन्न, जबाबदाऱ्या आणि जीवनाच्या विविध टप्प्यांनुसार बदलत जाणारा एक गतिमान आर्थिक साधन आहे. योग्य वेळी आणि योग्य टप्प्यावर जीवन विम्यात गुंतवणूक केल्यास संपूर्ण आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता अधिक प्रभावीपणे साधता येते. शेवटी, हे असे दीर्घकालीन आर्थिक साधन आहे ज्यात सेवा पुरवणाऱ्याकडे माघार घेण्याचा पर्याय नसतो.

Web Title: Importance of life insurance at every stage of life see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Business News
  • Insurance
  • Insurance Claim
  • Insurance Policy
  • Marathi News
  • medical insurance

संबंधित बातम्या

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…
1

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
2

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
3

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री
4

Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! Belkinच्या नव्या Earbuds-Headphonesची जोरदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.