4 वर्षात 50 हजाराचे झाले 25 लाख, एका वर्षात 400 टक्के परतावा, आता स्टॉक विभाजन हाेणार!
चालू आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम राहिला आहे. सकाळ सुमारास झालेल्या काहीशा पडझडीनंतर एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. त्यामुळे आज बाजार बंद होताना, तेजीसह बंद झाला आहे. बाजारात आज मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांचे निर्देशांक घसरले असले तरी, त्यांनी खालच्या पातळीवरून सावरण्यातही यश मिळविले आहे.
सोमवारी बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 375 अंकांच्या वाढीसह 81,559 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 84 अंकांच्या उसळीसह 24,936 अंकांवर बंद झाला आहे. आजच्या व्यवहारात, एचयूएल आणि आयटीसी सारख्या एफएमसीजी शेअर्सने बाजाराला दिलासा दिला आहे.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण, कोणते शेअर्स तेजीत
वाढत्या समभागांवर नजर टाकल्यास, एचयूएल 2.84 टक्के, आयसीआयसीआय बँक 2.03 टक्के, आयटीसी 1.95 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.59 टक्के, इंडसइंड बँक 1.40 टक्के, अॅक्सिस बँक 0.76 टक्के, नेस्ले 0.55 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट आणि महाड्रेन 0.50 टक्के. टक्के, एचडीएफसी बँक 0.50 टक्क्यांच्या वाढीसह, बजाज फायनान्स 0.37 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहे. घसरलेल्या समभागांमध्ये टेक महिंद्रा 2.54 टक्के, टाटा स्टील 1.16 टक्के, एनटीपीसी 1.10 टक्के, टाटा मोटर्स 0.71 टक्के, पॉवर ग्रिड 0.41 टक्के, टायटन 0.41 टक्के, एचसीएल टेक 0.35 टक्के, जेएसडब्लू स्टील 0.29 टक्के घसरणीसह बंद झाले आहे.
मार्केट कॅपमध्ये केवळ 21000 कोटी रुपयांची तेजी
भारतीय शेअर बाजार आज तेजीसह बंद झालेला पाहायला मिळाला. यामध्ये मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप व्यतिरिक्त, आयटी समभागांच्या घसरणीमुळे मार्केट कॅप मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या तुलनेत अर्थात शुक्रवारच्या तुलनेत समान पातळीवर बंद झालेले पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप आज 460.39 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील सत्रात 460.18 लाख कोटी रुपये होते. अर्थात आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये केवळ 21000 कोटी रुपयांची तेजी दिसून आली आहे.
एफएमसीजी क्षेत्रातील समभाग आजच्या व्यवहारात स्टार परफॉर्मरची भुमिका पार पाडताना दिसून आले. निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 1290 अंकांच्या उसळीसह 64,465 अंकांवर बंद झाला. याशिवाय बँकिंग, वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे. तर ऑटो, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, एनर्जी, मेटल, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि मीडिया शेअर्स घसरले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)