अहिल्यानगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांनी सादर केलेल्या देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. यामध्ये शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे सादर केलेल्या देशातील सर्वात मोठ्या “ऑपरेशन सिंदूर” या जिवंत देखाव्याने नगरकरांचे विशेष लक्ष वेधले. तब्बल २५ ते ३० कलाकारांनी साकारलेल्या या थरारक प्रसंगांनी प्रेक्षकांचा अंगावर काटा आणला. देखाव्याच्या उद्घाटनावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, माजी महापौर सुरेखा कदम, माजी नगरसेविका मंगल लोखंडे यांच्यासह प्रयास ग्रुपच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी व्यक्त केले की, या सादरीकरणामुळे देशभक्तीची भावना पुन्हा जागृत झाली असून नगरकरांनी शिवगर्जनाच्या या उपक्रमाला मोठी दाद दिली.