ठाणे बदलापूर मेट्रो ५ मार्गिकेवरील अंबरनाथमधल्या दोन मेट्रो स्थानकांना ‘कानसई गाव’ आणि ‘श्री क्षेत्र शिवमंदिर’ अशी नावं देण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. बुधवारी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत त्यांनी याबाबतचं निवेदन सादर केलं. मेट्रो ५ मार्गिका ही ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, चिखलोली ते बदलापूर अशी असणार आहे. या मार्गिकेवर अंबरनाथच्या जीएनपी गॅलेक्सी आणि महात्मा गांधी विद्यालय या दोन ठिकाणी मेट्रो स्थानकं प्रस्तावित आहेत. यापैकी जीएनपी गॅलेक्सी मेट्रोवस्थानक हे एएमपी गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोर स्थलांतरित करावं आणि या स्थानकाला कानसई गाव नाव द्यावं, अशी मागणी कुणाल भोईर यांनी केली.