'ही' विमान कंपनी 1000 हून अधिक महिला पायलट भरती करणार; वाचा... काय आहे योजना!
इंडिगो ही देशातील सर्वात कमी विमानसेवा पुरवणारी आघाडीची विमान कंपनी आहे. स्वस्तात असणाऱ्या सेवेमुळे देशात इंडिगोची चलती आहे. अशातच आता इंडिगो कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. २०२५ पर्यंत कंपनीने तब्बल 1000 हून अधिक महिला पायलटची भरती करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया सुरु होणार असून, त्यामुळे आता महिला पायलटला अच्छे दिन येणार आहेत.
कंपनीच्या सेवांमधील विस्तारामुळे भरतीचा निर्णय
भारताचा डोमेस्टीक फ्लायर्स अर्थात देशांतर्गत क्षेत्रातील विमान वाहतूकीत जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अशात आता कंपनीने आपल्या पायलटच्या ताफ्यातील महिला पायलटच्या संख्येत 1000 हून अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने कंपनीच्या सेवांमध्ये विस्तार झाल्याने, आता कंपनीला आपल्या पायलटच्या रिक्त जागा तातडीने भराव्या लागणार आहेत. हीच बाबा लक्षात घेऊन आता कंपनीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 1000 हून अधिक महिला पायलटची भरती करण्याची घोषणा केली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हेही वाचा – आरबीआयची बॅंक ऑफ महाराष्ट्रावर मोठी कारवाई; …तुमचे तर खाते नाही ना!
काय म्हटलंय कंपनी प्रशासनाने याबाबत
या घोषणेबाबत बोलताना इंडिगो ग्रुपचे प्रमुख एचआर सुखजीत एस.पसरीचा यांनी म्हटले आहे की, कंपनीने एयरलाइन इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफसह प्रत्येक सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणाता सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कपनीने 360 डिग्री एप्रोचवर काम करीत आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्व विमान कंपन्यामध्ये इंडिगो विमान कंपनीकडे सर्वात ज्यास्त महिला पायलट आहेत. ही संख्या कंपनीच्या एकूण पायलट्सच्या सुमारे 14 टक्के इतकी आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
ऑगस्त 2025 पर्यंत टार्गेट पुर्ण करणार
इंडिगो ही कंपनी भारतातील कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक कंपनी आहे. कंपनीने ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्या महिला पायलटच्या संख्येत 1,000 हून अधिक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला इंडिगो विमान कंपनी दररोज 5000 हून अधिक विमानांचे संचलन करते. कंपनीजवळ एकूण 5,000 हून अधिक पायलट आहेत. तर सध्या कंपनीकडे एकूण 36,860 कर्मचारी काम करत आहे.