फोटो सौजन्य - Social Media
मूलांक १ म्हणजे स्वामी सूर्याचे अनुयायी! यांना सूर्यच म्हणाले तरी चुकीचे नाही. सूर्यासारखे कणखर आणि तापट व्यक्तिमत्व असणारी लोकं १,१०,११ आणि १९ तारखेला जन्म घेतात. या दिवशी जन्माला येणाऱ्या लोकांच्या स्वभावात एक साम्य असते ते म्हणजे राग आणि अहंकार! या व्यक्तींमध्ये Ego ठासून भरलेला असतो. शेवटी, सूर्य म्हणजे राजा यांचा स्वामी आहे त्यामुळे यांना यांचे जीवन अगदी राजासारखे जगायला आवडते. यांना लोकांना हाताखाली नाचवायचा आवडतं. यांना कधीही कुणाच्या हाताखाली काम करणे जमत नाही. एक राजांमध्ये जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म मूलांक १ असणाऱ्या व्यक्तीमध्ये असते.
जर तुम्ही मूलांक १ आहात आणि आयुष्यात पुढे जाताना तुम्हाला काही समस्या जाणवत आहेत. तर समजा की तुमचा Ego तुम्हाला आडवा येतोय. सतत मीच श्रेष्ठ असे तुम्ही वागत आहात. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण नाही. या गोष्टी करणे सोडा आणि पहा. यश स्वतः तुमच्या पायाशी धावत येईल. काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केलात, तर तुमच्या आयुष्यात बऱ्यापैकी सुधार तुम्हाला पाहायला मिळेल.
मूलांक १ आहात तर लोकांना ऐकायला शिका. ऐकाल तर वाचाल. अहंकारात बुडालं तर आयुष्यातही बुडालं! माहिती आहे तुमचा राग असाह्य आहे. नाही येत तुम्हाला नियंत्रण करता पण हवं तर एका काउंसलरची मदत घ्या आणि रागाला शांत करण्यास शिका. राग कमी केलात तर भविष्य उत्तम आहे. तुमच्या आयुष्यात संयम फार महत्वाचा आहे. सकाळ सकाळी उन्हामध्ये काही वेळ फेरफटका मारा. तुमचा स्वामी सूर्यदेव याचा आशीर्वाद घ्या. काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळा. सूर्याच्या रंगाने प्रेरित असणारे रंग पिवळा, भगवा असा रंगांचे कपडे परिधान करा. जमल्यास रविवारी सूर्याची आराधना म्हणून उपवास करा.
कामात निरंतर राहा. सातत्यता असेल तर यश स्वतः तुमच्यापाशी चालत येईल.