फोटो सौजन्य: @PowerTorqueTVS (X.com)
भारतात प्रत्येक व्यक्तीचे बाईक खरेदी करण्याचे एक स्वप्न असते. त्यातही अनेक जणांची पहिली पसंत ही बजेट फ्रेंडली बाईकला जास्त असते. मात्र, अनेकदा कमी पगारामुळे बाईक खरेदी करणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेत आज आपण अशा एका बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्ही फक्त 15 हजार रुपयांच्या पगारात सुद्धा खरेदी करू शकतात.
भारतीय ऑटो बाजारपेठेत दुचाकींना मोठी मागणी मिळत आहे. जर तुम्ही दररोज घरापासून ऑफिसपर्यंत प्रवास करण्यासाठी स्वस्त आणि चांगली मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असाल, तर भारतीय बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक बाईक उपलब्ध आहेत.
Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर TVS Sport तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला TVS Sport बाईकची ऑन-रोड किंमत, EMI आणि डाउन पेमेंटबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
टीव्हीएस स्पोर्ट बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या बेस व्हेरियंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हीलची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत सुमारे 72 हजार रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरियंट स्पोर्ट सेल्फ स्टार्ट अलॉय व्हील व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे 86 हजार रुपये आहे.
Vinfast Limo Green इलेक्ट्रिक MPV भारतात येणार? सिंगल चार्जवर मिळेल 450 किमीची रेंज
जर तुम्ही नवी दिल्लीमध्ये 10000 रुपयांचे डाउन पेमेंट देऊन TVS Sport चा बेस व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला त्यासाठी 62000 रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. तुम्हाला हे लोन 9.7 टक्के व्याजदराने मिळेल. हे लोन फेडण्यासाठी तुम्हाला 3 वर्षांसाठी दरमहा 2000 रुपयांचा EMI भरावा लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुमचे लोन आणि त्यावरील व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात.
मायलेजबद्दल सांगायचे झाले तर टीव्हीएस स्पोर्ट बाईकबद्दल कंपनीचा दावा आहे की ही प्रति लिटर 70 किमी पेक्षा जास्त मायलेज देते. यात टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक अॅब्झॉर्बर आहे. या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रति तास पेक्षा जास्त आहे. बाजारात ही बाईक होंडा सीडी ११० ड्रीम, हिरो एचएफ 100 आणि बजाज सीटी 110 एक्स सोबत स्पर्धा करते.