फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा सूर्य सध्या कर्क राशीमध्ये उपस्थित आहे. आता तो आज 17 ऑगस्ट रोजी पहाटे 1.41 वाजता सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीमध्ये होता आता त्याने आज 17 ऑगस्ट रोजी पहाटे 1.41 वाजता सिंह राशीत आपले संक्रमण केले आहे. त्याचे हे नक्षत्र बदल काही राशीच्या लोकांना सकारात्मक ठरणार आहे. आता तो आश्लेषा पासून माघ नक्षत्रात आपले स्थान घेणार आहे. सूर्य ग्रहाला आदर, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि उच्च पद दर्शविणारा ग्रह मानले जाते. यामुळे काही राशीच्या लोकांना त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. त्याचप्रमाणे सकारात्मक बदल होताना देखील दिसून येऊ शकतात. कोणत्या राशीच्या लोकांना बदलाचा फायदा होणार आहे, जाणून घ्या
सिंह राशीच्या लोकांना सूर्याच्या नक्षत्रातील बदलाचा विशेष फायदा होणार आहे. यामुळे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. याकाळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. तसेच या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रस असेल. वाद किंवा भाषणाशी संबंधित कामात तुम्हाला चांगली ओळख मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील.
वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्याचे हे नक्षत्र संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात. बऱ्याच काळापासून जमीन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. पैसे कमविण्याचे नवीन मार्ग उघडू शकतात. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात. नोकरीतील बदलही सकारात्मक राहील. करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित संधी मिळतील. व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल.
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला आहे. आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर ती जवळच्या मित्रांच्या मदतीने पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी लोकांसोबत एकत्र काम केल्याने तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना नफ्याच्या भरपूर संधी मिळतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)