इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
इराणच्या संभाव्य अणुशस्त्र निर्मितीच्या वाढत्या धोक्याबद्दल हे पाऊल उचलण्यात आले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदनही जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, ६२ संस्था आणि नऊ प्रमुख व्यक्तींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. ब्रिटनच्या मते, या संस्था आणि व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे इराणच्या अणु शस्त्रांच्या विकासाशी जोडले गेले आहेत.
शिवाय ब्रिटनने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा इराण आपल्या अणु कार्यक्रमात वाढ करत आहे. इराणने शस्त्रास्त्रे आणि युरेनियमचा साठा मोठ्या प्रमाणात समृद्ध करण्यास सुरुवात केली आहे. पण यामुळे जगातिक शांतता आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे.
‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार
ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव यवेट यांनी निवेदन जारी करताना म्हटले की, इराणचा अणु प्रकल्प गेल्या अनेक काळापासून आंतरराष्ट्रीय समुदायाशी चिंतेचा ठरत आहे. यामुळे मद्य पूर्वेत प्रादेशिख अस्थिरता निर्माण होत आहे, तसेच विश्व शांतीला देखील धोका निर्माण होत आहे. यामुळे इराणच्या संबंध असलेल्या संस्था आमि व्यक्तींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच इराणला इशाराही देण्यात आला आहे की, त्यांच्या अणु कार्यक्रमाला रोखण्यासाठी ब्रिटन आवश्यक ती पावले उचलण्यास मागे हटणार नाहीत.
यापूर्वी E3 देश ब्रिटन, फ्रान्स, आणि जर्मनीने एकत्रितपणे इराणवर स्नॅपबॅक प्रक्रियेचा वापर केला होता. ही प्रक्रिया संयुक्त राष्ट्रांनी उठवलेल्या निर्बंधांना पुन्हा लागू करण्याची अनुमती देते. पण संयुक्त राष्ट्राने याला नाकारले होते.
दरम्यान इराणने ब्रिटन आणि E3 देशांच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या अणु प्रकल्प केवळ देशात उर्जा निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी आहे. तसेच कोणीही कितीही निर्बंध लादले तर इराण अणु कार्यक्रमापासून मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. पण २०१५ इराणवरील काही निर्बंध हटवण्यात आले होते, तेव्हापासून इराणने सतत कराराचे उल्लंघन केल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. यामुळे जगभरात चिंतेच वातावरण आहे.
प्रश्न १. ब्रिटनने इराणवर कारय कारवाई केली?
ब्रिटनने इराणच्या अणु प्रकल्पाशी संबंधित ६२ संस्था आणि ९ व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत.
प्रश्न २. ब्रिटनने का इराणवर केली कारवाई?
ब्रिटनने इराणच्या वाढत्या अणु शस्त्रांच्या विकासाला आणि युरेनियमच्या समृद्ध साठ्याच्या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी इराणविरोधात मोठी कारवाई केली आहे.
प्रश्न ३. इराणने ब्रिटनच्या कारवाईवर काय प्रतिक्रिया दिली?
इराणने ब्रिटनच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या अणु प्रकल्प केवळ देशात उर्जा निर्माण करण्यासाठी आहे.
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली






