Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धाच्या भडक्याचा शेअर बाजाराला मोठा फटका! अवघ्या एका आठवड्यात गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी पाण्यात

Iran Israel युद्धाच्या भडक्यामुळे जागतिक आणि भारतीय देशांतर्गत बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील उलथापालथ आणि त्याचा इतर घटकांवरील परिणाम यामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशीही बाजारात मोठी घसरण दिसली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 14, 2026 | 02:52 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजारातील या परिस्थितीमुळे भीतीदायक वातावरण
  • गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
  • या क्षेत्रांमध्ये शेअरची विक्री जास्त
Indian Stock Market Weekly Loss : Iran Israel युद्धाच्या भडक्यामुळे जागतिक आणि भारतीय देशांतर्गत बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजारातील उलथापालथ आणि त्याचा इतर घटकांवरील परिणाम यामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशीही बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 1470.50 अंकांनी घसरून 74,563.92 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 50 488.05 अंकांनी घसरून 23,151.10 वर बंद झाला. शेअर बाजारातील या परिस्थितीमुळे भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावं लागत आहे.

जगाच्या नजरेपासून दूर, भारताचा ‘एनर्जी मास्टरप्लॅन’! ‘या’ कारणामुळे संकटातही भारत निवांत…

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

बाजारातील या सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, या आठवड्यात गुंतवणूकदारांना एकूण 19.86 लाख कोटींचे नुकसान झालं आहे. विचार केला असता फक्त शुक्रवारी गुंतवणूकदारांना 10.24 लाख कोटींचं नुकसान झालं आहे.
२८ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या परिणामामुळे युद्ध सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांना 33.68 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता आणि भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.

या क्षेत्रांमध्ये शेअरची विक्री जास्त

या आठवड्यात शेअर बाजारावर अनेक क्षेत्रांवर दबाव दिसून आला. ऑटो क्षेत्रात सर्वात मोठी घसरण दिसून आली. आठवड्यात ऑटो क्षेत्रात अंदाजे 10.64 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे ऑटो निर्देशांक 26,770 अंकांवरून अंदाजे 24,195 वर आला. बाजारातील उलथापालथ आणि त्यामुळे अस्थिरतेमुळे विक्रीकडे झुकाव दिसला. त्यामुळे विक्रीच्या दबावाचा सर्वात जास्त परिणाम ऑटो क्षेत्रावर झाला आहे.
ऑटो नंतर, सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्र घसरणीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र होते, ज्यामध्ये अंदाजे 7.27 टक्के घट झाली. शिवाय, धातू क्षेत्रात 5.90 टक्के, रिअल इस्टेटमध्ये 4.34 टक्के, तेल आणि वायूमध्ये 4.25 टक्के आणि आयटी क्षेत्रात अंदाजे 3.54 टक्के इतकी घट झाली.

परदेशी गुंतवणूकदार सतत अंतर ठेवून

अनिश्चित वातावरणामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेपासून दूर राहण्याची शक्यता वाढत आहे. शुक्रवार, 13 मार्च रोजीही परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. उपलब्ध आकडेवारीनुसार, त्या दिवशी एफपीआय आणि एफआयआयनी अंदाजे ₹10,716.64 कोटी किमतीचे शेअर्स विकले. ही गेल्या वर्षभरातील सर्वात मोठी एका दिवसाची विक्री असल्याचं मानलं जात आहे.

संपूर्ण आठवड्यात, परदेशी गुंतवणूकदार विक्रीच्या बाजूने राहिले. त्यांनी अंदाजे ₹36,071 कोटी किमतीचे इक्विटी शेअर्स विकले. तथापि, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) बाजाराला काही आधार दिला, अंदाजे ₹37,740 कोटींची निव्वळ खरेदी केली.

Gold Rate: युद्ध सुरू असतानाही सोने-चांदी स्वस्त का? किमतींमध्ये घसरण का होतेय?

(टीपः येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्या. Navarashtra कधीही येथे गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही.)

Web Title: Iran israel war impact on indian stock market investore lose 19 lakh crore sensex nifty fall fpi selling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Iran Israel Conflict
  • share
  • share market news

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
2

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये
3

Hybrid Home Loan : होम लोनचा हप्ता वाढण्याची भीती? हायब्रिड होम लोनचा पर्याय ठरेल फायदेशीर; वाचतील लाखो रुपये

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
4

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.