पैसे तयार ठेवा! नवीन वर्षात येणार देशातील सर्वात मोठा आयपीओ; वाचा... यादी!
वर्ष 2024 हे आयपीओचे राहिले आहे. या वर्षात ह्युंदाई मोटर्स इंडिया, बजाज हाऊसिंग फायनान्स, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिक सारख्या मोठ्या कंपन्यांनी आयपीओ आणले. भारतीय कंपन्यांनी आयपीओ, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट्स आणि राइट्स इश्यूमधून यावर्षी 3 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. वर्ष 2021 मधील 1.88 लाख कोटी रुपयांच्या विक्रमापेक्षा हा आकडा 64 टक्के जास्त आहे. नवीन वर्ष 2025 मध्येही हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशातील सर्वात मोठा आयपीओ या वर्षी येऊ शकतो.
आतापर्यंत 90 कंपन्यांनी 1.62 लाख कोटी रुपये
आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत 90 कंपन्यांनी 1.62 लाख कोटी रुपये उभे केले आहेत. गेल्या वर्षीच्या 49,436 कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण 2.2 पट अधिक आहे. वर्ष 2025 मध्ये एलजी इंडिया आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या कंपन्या बाजारात येण्याच्या तयारीत आहेत. ब्लूमबर्गच्या मते, एलजी आपल्या भारतीय युनिटचे मूल्य 15 अब्ज डाॅलरपर्यंत वाढविण्याचा विचार करत आहे. भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट देखील या वर्षी आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे मूल्यांकन 36 अब्ज डाॅलर आहे. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असू शकताे. वॉलमार्टच्या मालकीच्या फर्मला सिंगापूरहून भारतात पत्ता हलवण्यास अंतर्गत मान्यता मिळाली आहे. हे आयपीओच्या दिशेने पहिले पाऊल मानले जाते.
नववर्षात श्रीमंत व्हायचंय… या 18 शेअर्सवर ठेवा लक्ष, प्रत्येक स्टॉकवर मिळेल मोठा नफा!
एनबीएफसी हा सर्वात मोठा आयपीओ दाखल
याशिवाय अनेक बड्या कंपन्या त्यांच्या उपकंपन्यांचे लिस्टिंग करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, मणप्पुरम फायनान्स, मुथूट फायनान्स, ब्रिगेड एंटरप्राइजेज, कॅनरा बँक आणि ग्रीव्स कॉटन यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपूर्वी ग्रीव्हज कॉटनच्या बोर्डाने त्याच्या उपकंपनी ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी आयपीओ मंजूर केला. यापूर्वी, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, एचडीएफसी बँकेची एनबीएफसी शाखेने 12,500 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला होता. हा भारतातील सर्वात मोठा एनबीएफसी आयपीओ आहे.
ब्रिगेड एंटरप्रायझेसची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्सने 31 ऑक्टोबर रोजी 900 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला. ऑगस्टमध्ये हीरो मोटोकॉर्पची आर्थिक सेवा शाखा हीरो फिनकॉर्पने आयपीओसाठी 2,100 कोटी रुपये किमतीचे शेअर्स आणि1,568 कोटी रुपयांच्या आेएफएसच्या नवीन इश्यूसह डीआरएचपी दाखल केला.
कॅनरा बँकेच्या बोर्डाने त्यांच्या म्युच्युअल फंड शाखा, कॅनरा रोबेकोमधील 13 टक्के भागभांडवल सार्वजनिक ऑफरद्वारे विकण्यास मान्यता दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स त्यांच्या उपकंपन्या रिलायन्स जिओ आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी आयपीओची योजना करत आहेत.
मुकेश अंबानी या वर्षी त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओचे लिस्टिंग करू शकतात. त्याची किंमत 100 अब्ज डाॅलरपेक्षा जास्त आहे. रिलायन्सच्या रिटेल कंपनीचा आयपीओही नंतर लॉन्च केला जाऊ शकतो. अंबानी यांनी 2019 मध्ये घोषणा केली होती की रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल 5 वर्षांच्या आत सूचीबद्ध केले जातील.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)