नागपूर महापालिका निवडणूक : १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध, निवडणूक रंगात
निवडणुकीत विविध प्रवर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक १६ वैध उमेदवार तर ३३ मध्ये अनुसुचित जाती प्रवर्गातून १९ उमेदवार निवडणुकीत आहे. या प्रक्रियेसाठी इंदिरा बौधरी, प्रदीप शेलार, प्रियेश महाजन, संपत खताळे, मलिक वीरानी यांनी क्षेत्रातील आकडेवारी अंतिम केली. अद्याप कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद दाखल नाही.
आघाडी/फ्रंटला प्राधान्य : मुक्त चिन्हांच्या वाटपात आघाडी किंवा फ्रंटला अपक्ष उमेदवारांपेक्षा प्राधान्य दिले जाईल,
लॉटरी पद्धत: एकाच चिन्हासाठी एकाहून अधिक आघाड्या किंवा फ्रंटचे दावे आल्यास पारदर्शक पद्धतीने चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला जाईल.
अपक्ष उमेदवारांचा क्रम : आघाड्यांना चिन्ह वाटप झाल्यानंतर उर्वरित चिन्हे अपक्ष उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार दिली जातील.
सर्वाधिक नामांकन :
आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. २, ३, ६ व ७ मध्ये सर्वाधिक १८० वैध नामांकन नोंदविण्यात आले.
इतर प्रमुख झोन :
मंगळवारी झोनमध्ये १५३, नेहरूनगर झोनमध्ये १४४, तर गांधीबाग झोनमध्ये १३९ वैध उमेदवार आहेत.
किमान नामांकन
लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्र. १६, ३६, ३७ व ३८ मध्ये सर्वांत कमी ७५ वैध नामांकन नोंदविले.
निवडणूक प्रक्रियेनुसार शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन मागे घेता येणार आहे. त्यानंतरच अंतिम निवडणूक चित्र स्पष्ट होईल. या प्रक्रियेनंतर अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ३ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हे निश्चित होतील.






