नारायण मूर्तींनी खरेदी या दिवाळखोर उद्योगपतीचे घर; किंमत वाचून चक्रावून जाल!
उद्योगपती नारायण मूर्ती हे त्यांची व्यावसायिक तत्त्वे, नैतिकता आणि कधीकधी वादग्रस्त विचार समाजासमोर मांडण्यासाठी ओळखले जातात. मात्र, अशातच आता ते एका करारामुळे चर्चेत आले आहेत. देशातील आघाडीची आयटी कंपनी इंन्फोसिसच्या संस्थापकांनी बंगळुरू येथे या करारावर स्वाक्षरी केली आहे. बंगळुरू येथे कंपनीचे कॉर्पोरेट मुख्यालय आहे.
नारायण मुर्ती यांनी केलेला हा करार कोणत्याही आयटी उत्पादनांसाठी किंवा आयटी आधारित सेवांसाठी नाही. तर तो एक रिअल इस्टेट डील क्षेत्रासाठीचा व्यवहार असणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील दिग्गज असलेले नारायण मूर्ती हे आता रिअल इस्टेटमध्येही हात आजमावणार आहेत का? असे नाही. तर त्यांनी स्वत:साठी एक अपार्टमेंट विकत घेतला आहे. जो सध्या खुपच चर्चेचा विषय बनला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
50 कोटींमध्ये झालाय हा सौदा
नारायण मूर्ती यांनी विकत घेतलेले हे आलिशान घर देशातील आलीशान जीवन जगणाऱ्या मात्र, दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर बांधले गेले आहे. 16 व्या मजल्यावर असलेला हा फ्लॅट अंदाजे 8400 स्क्वेअर फूटामध्ये बांधला आहे. त्याची किंमत इतकी आहे की नोएडा सारख्या ठिकाणी 25 व्हिला खरेदी करता येतील. या फ्लॅटचा सौदा सुमारे 50 कोटी रुपयांना झाल्याचे सांगितले जात आहे. नारायणमूर्ती यांचा येथील हा दुसरा फ्लॅट आहे.
गुंतवणुकीची संधी! 11 डिसेंबरला खुला होणार ‘हा’ तगडा आयपीओ, वाचा… कितीये किंमत पट्टा
चार वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी याच अपार्टमेंटच्या २३ व्या मजल्यावर २९ कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला होता. विजय मल्ल्या यांनी यूबी सिटीमध्ये साडेचार एकरमध्ये पसरलेल्या किंग फिशर टॉवर्समध्ये तीन ब्लॉकमध्ये 81 अपार्टमेंट बांधले होते. 34 मजली टॉवरमधील प्रत्येक फ्लॅटचा आकार अंदाजे 8321 चौरस फूट आहे.
फ्लॅटची खासियत काय आहे?
नारायण मूर्तींच्या या नवीन अपार्टमेंटमध्ये चार बेडरूमचा फ्लॅट आणि पाच कार पार्किंगची जागा आहे. सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील यूबी सिटीमध्ये स्थित किंगफिशर टॉवर्स हे बेंगळुरूमधील सर्वात सुंदर निवासी ठिकाणांपैकी एक मानले जाते. कॉर्पोरेट कंपन्यांची आलिशान कार्यालयेही येथे बांधली आहेत. येथील इतर प्रमुख रहिवाशांमध्ये बायोकॉनचे किरण मुझुमदार शॉ आणि कर्नाटकचे मंत्री केजे जॉर्ज यांचा मुलगा राणा जॉर्ज यांचा समावेश आहे.
कोण आहेत नारायण मूर्ती
नागवार रामराव नारायणमूर्ती ऊर्फ एन.आर. नारायणमूर्ती हे भारतीय उद्योजक, सॉफ्टवेर अभियंता व इन्फोसिस टेक्नॉलॉजीज कंपनीचे संस्थापक आहेत. ते एक भारतीय अब्जाधीश व्यापारी आहे. ते इन्फोसिस मधुन निवृत्त होण्यापूर्वी आणि अध्यक्षपदी पदभार स्वीकारण्यापूर्वी कंपनीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक होते. ऑक्टोबर २०२२ पर्यंत, त्यांची एकूण संपत्ती ४.५ अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे. ज्यामुळे फोर्ब्सच्या मते २०२२ मध्ये ते जगातील ६५४ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.