धनंजय मुंडे यांना दिलासा (फोटो- सोशल मीडिया)
परळी कोर्टाने फेटाळली करुणा मुंडे यांची तक्रार
धनंजय मुंडे यांना मिळाला मोठा दिलासा
ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेली तक्रार
बीड: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. करुणा मुंडे यांनी केलेली तक्रार परळी कोर्टाने फेटाळून लावल्याचे समोर येत आहे. करुणा मुंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल केली होती. धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. त्यावर आता कोर्टाने आपला निर्णय दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी माहिती नमूद दिल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. यावर परळी कोर्टात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कोर्टाने त्यांची तक्रार फेटाळून लावली आहे. दरम्यान करुणा मुंडे या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे.
बातमी अपडेट होत आहे…






