Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Impact on Sweets: आईक्रीम-चॉकलेट लवर्सना झटका! इराण युद्धामुळे ‘स्वीट डिश’ महागल्या, Trump यांच्यामुळे भडकणार किमती ?

कडक उन्हात, आईस्क्रीम निदान दिलासा देईल असं वाटत असताना आता त्यांच्याही किंमती वाढणार आहेत. खरं तर, सात समुद्रांपार पेटलेल्या युद्धाची आग तुमच्या रेफ्रिजरेटरपर्यंत पोहोचली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आईस्क्रीमच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ
  • कंपन्यांच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम
  • कंपन्यांच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम
War Impact on Sweets: आतापर्यंत, एलपीजी गॅस मिळवण्यासाठी लोकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यात भर म्हणजे, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलदेखील महाग होण्याची भीती होती. या चिंता आणि कडक उन्हात, आईस्क्रीम निदान दिलासा देईल असं वाटत असताना आता त्यांच्याही किंमती वाढणार आहेत. खरं तर, सात समुद्रांपार पेटलेल्या युद्धाची आग तुमच्या रेफ्रिजरेटरपर्यंत पोहोचली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या तणावामुळे पुरवठा साखळी इतकी विस्कळीत झाली आहे की, आईस्क्रीम आणि चॉकलेटमध्ये वापरले जाणारे सुकामेवा आणि कोको आवाक्याबाहेरचे महाग झाले आहेत. एकूणच, पश्चिम आशियातील संघर्षामुळे तुमच्या ‘गोड पदार्था’ची चव बिघडायला सुरुवात झाली आहे.

Stock Market Today: जागतिक तेजीचा प्रभाव! आज सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह उघडणार? या शेअर्सवर ठेवा नजर

आईस्क्रीमच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ

कंपन्या आईस्क्रीम आणि चॉकलेटची चव वाढवण्यासाठी बदाम, काजू आणि पिस्ता यांसारख्या सुक्या मेव्याचा वापर करतात. अलीकडच्या काळात या सुक्या मेव्याच्या किमतीत १५ ते २२ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. एका वृत्तानुसार, नॅचरल्स आईस्क्रीमचे संचालक सिद्धांत कामत यांनी स्पष्ट केले की, चॉकलेट बनवण्यासाठी वापरला जाणारा कोको आणि सुक्या मेव्याच्या पुरवठ्यात मोठी समस्या आहे. ते म्हणाले की, यापैकी अनेक वस्तू सागरी मार्गाने आयात केल्या जातात, परंतु युद्धामुळे जहाजे वेळेवर पोहोचू शकत नाहीत. या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कंपनीने आपल्या आईस्क्रीमच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ केली आहे.

कंपन्यांच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम

जेव्हा कच्च्या मालाच्या किमती वाढतात, तेव्हा कंपन्यांसमोर दोन पर्याय असतात. एकतर वस्तू महाग करणे किंवा नफा कमी करणे. मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक जयतीर्थ चारी म्हणतात की, वाहतूक खर्च आणि कच्च्या मालाच्या जागतिक किमतींमधील वाढीमुळे त्यांनी काही निवडक आईस्क्रीमच्या किमतीही वाढवल्या आहेत. उन्हाळ्याच्या हंगामामुळे, कंपन्यांना आईस्क्रीममधील सुक्या मेव्याचे प्रमाण कमी करून त्याच्या गुणवत्तेशी तडजोड करायची नाही. दिनशॉ डेअरी फूड्सचे संचालक जार्विन राणा यांचा विश्वास आहे की, या परिस्थितीत कंपन्यांकडे वस्तूंची एमआरपी वाढवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.

चॉकलेटप्रेमींच्या खिशावरही भार

ही वाईट बातमी केवळ आईस्क्रीम प्रेमींसाठीच नाही, तर चॉकलेट प्रेमींसाठीही आहे. पास्कती चॉकलेट्सचे संस्थापक देवांश आशेर यांच्या मते, हेझलनट्ससारखे सुकामेवा गेल्या वर्षीच्या तुलनेत ७५ टक्क्यांपर्यंत महाग झाले आहेत. हे सुकामेवा अनेकदा तुर्कस्तानसारख्या देशांमधून येतात, परंतु युद्धामुळे आता ते समुद्रमार्गे आयात करण्याऐवजी विमानमार्गे आयात करावे लागत आहेत, ज्यामुळे खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.

इतकेच नाही, तर पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या थर्मोकोल बॉक्सच्या किमतीही वाढल्या आहेत. वाल्को फूड कंपनीचे असेही म्हणणे आहे की, जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढल्या, तर कंपन्यांना हा आणखी एक मोठा फटका बसेल. स्पष्टपणे, पुढील एक-दोन महिन्यांत तुम्हाला या गोड पदार्थांवर थोडे अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात.

अतिउष्णतेचा GDP फटका ! गर्मीच्या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर संकट; वीज आणि रोजगारावरही परिणाम

Web Title: Latest ice cream chocolate prices rise due to west asia war impact see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Best Chocolate
  • Chocolate
  • Diesel Petrol Price
  • Inflation Increases
  • LPG Gas
  • Middle East War Impact

संबंधित बातम्या

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
1

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Petrol News: खुशखबर! पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा
2

Petrol News: खुशखबर! पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा

किती अवलंबून राहणार होर्मुझवर? 30 वर्षांपासून अडकून होता… आता गुजरातपासून ओमानपर्यंत  भारत करणार ‘हे’ कामं
3

किती अवलंबून राहणार होर्मुझवर? 30 वर्षांपासून अडकून होता… आता गुजरातपासून ओमानपर्यंत भारत करणार ‘हे’ कामं

उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये बदल… LPG पुरवठ्याबाबत घेतलेल्या निर्णयांचा ग्राहकांवर काय होणार परिणाम?
4

उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये बदल… LPG पुरवठ्याबाबत घेतलेल्या निर्णयांचा ग्राहकांवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.