Stock Market Today: जागतिक तेजीचा प्रभाव! आज सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह उघडणार? या शेअर्सवर ठेवा नजर
Credit Card आता तुमच्या मोबाईलमध्ये! PNB कडून ‘UPI वर क्रेडिट’ सेवा सुरू, असा घ्या लाभ…
शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,९०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ९९९.७९ अंकांनी, म्हणजेच १.२९ टक्क्यांनी घसरून ७६,६६४.२१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २७५.१० अंकांनी, म्हणजेच १.१४ टक्क्यांनी घसरून २३,८९७.९५ वर स्थिरावला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक २१५.२५ अंकांनी, म्हणजेच ०.३८ टक्क्यांनी घसरून ५६,०८९.७५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार कोल इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी टोटल गॅस, एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, अॅक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पेटीएम, एनटीपीसी, अदानी ग्रीन, मनाप्पुरम फायनान्स, हिंदुस्तान पेट्रोलियम या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. व्यंकटरमण यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये वर्धमान टेक्सटाइल्स लिमिटेड, विजया डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड, पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आरबीएल बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी गुंतवणूकदारांना खरेदी-विक्री करण्यासाठी टाटा पॉवर, सेल (SAIL) आणि टीसीआय (TCI) या तीन शेअर्सची शिफारस केली आहे. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना पीव्हीआर आयनॉक्स, इंटेलेक्ट डिझाइन अरेना, जेएसडब्ल्यू एनर्जी हे तीन स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयपीसीए लॅबोरेटरीज, वरुण बेवरेजेस, बँक ऑफ महाराष्ट्र, टिटागड रेल सिस्टीम्स आणि गुजरात फ्लोरोकेमिकल्स यांचा समावेश आहे.






