Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPFO Interest Rules: नोकरी नसली तरीही तुमच्या PF खात्यावर मिळणार Interest? पाहा काय सांगतो सरकारी नियम

बऱ्याच लोकांना असे वाटते की, जर तुमची नोकरी गेली आणि तुम्हाला नवीन नोकरी मिळाली नाही, तर तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लकीवरील व्याज मिळत नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 12, 2026 | 04:31 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नोकरी सुटल्यावर काय होतं?
  • कसं मिळतं व्याज?
  • ईपीएफमध्ये तुमचे पैसे ठेवणे सुरक्षित
EPFO Interest Rules : ईपीएफ ही भारत सरकारची एक सुरक्षित सेवानिवृत्ती योजना आहे. कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही दरमहा त्यांच्या पगाराच्या १२% रक्कम ईपीएफमध्ये जमा करतात. या पैशांमुळे तुमची बचत वाढते आणि त्यावर वार्षिक व्याज देखील मिळते. व्याजदर प्रत्येक आर्थिक वर्षात निश्चित केला जातो. सध्या, २०२५-२६ साठी व्याजदर ८.२५% इतका आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की, जर तुमची नोकरी गेली आणि तुम्हाला नवीन नोकरी मिळाली नाही, तर तुमच्या ईपीएफ खात्यातील शिल्लकीवरील व्याज मिळत नाही. पण हे पूर्णपणे खरं नाही. ईपीएफ संस्थेच्या (EPFO) नियमांनुसार, तुम्ही बेरोजगार असलात आणि नवीन योगदान देत नसलात तरीही, तुमच्या जुन्या ईपीएफ शिल्लकीवर व्याज मिळत राहते.

LIC Bonus Share : LIC पहिल्यांदाच बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, कधी होणार मोठी घोषणा?

नोकरी सुटल्यावर काय होतं?

जेव्हा तुम्ही नोकरी सोडता, तेव्हा नवीन कंट्रीब्यूशन बंद होतं. तुमचे जुने ईपीएफ खाते बंद होत नाही. पैसे तसेच राहतात. जर ३६ महिन्यांपर्यंत म्हणजेच ३ वर्षांपर्यंत कोणतंही नवीन ट्रान्सझेशन झालं नाही तर मग ते खाते निष्क्रिय घोषित केले जाते. पण खाते निष्क्रिय झाले याचा अर्थ असा नाही की व्याज जमा होणे थांबलं.

व्याज वाढत राहतं का?

होय, तुम्हाला व्याज मिळत राहतं. ईपीएफओच्या नियमांनुसार, तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षात पोहोचेपर्यंत, नवीन अमाउंट जमा न केल्याससुद्धा तुमच्या ईपीएफ खात्यावर व्याज मिळत राहतो. २०१६ आणि २०१७ मध्ये सरकारने स्पष्ट केले होतं की, तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत सर्व खात्यांवर व्याज मिळत राहील. वयाच्या ५८ वर्षांनंतर, खाते निष्क्रिय मानले जाते आणि त्यानंतर कोणतेही व्याज दिले जात नाही. काही प्रकरणांमध्ये, पैसे न काढल्यास तुम्हाला अतिरिक्त तीन वर्षे व्याज मिळू शकते. तुमचे वय ३५ वर्षे आहे आणि तुम्ही नुकतीच नोकरी सोडली आहे. तुमच्या ईपीएफमध्ये ५ लाख रुपये आहेत. पुढील २३ वर्षांसाठी म्हणजे तुम्ही ५८ वर्षांचे होईपर्यंत या रकमेवर दरवर्षी सुमारे ८.२५% दराने व्याज मिळेल. हे व्याज चक्रवाढ पद्धतीने आकारले जाते, म्हणजेच तुम्हाला व्याजावरही व्याज मिळत राहतं.

कसं मिळतं व्याज?

व्याज वर्षाला ठरवला जातो. सामान्यतः वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते. त्याची गणना मासिक शिल्लकीवर केली जाते. व्याज करमुक्त असते.

या गोष्टी लक्षात ठेवा

अकाउंट ट्रांसफर करणं – तुम्हाला नवीन नोकरी मिळाल्यास, तुमचे जुने ईपीएफ खाते नवीन कंपनीत हस्तांतरित करा. यामुळे सर्व काही एकाच खात्यात राहते आणि व्यवस्थापन करणे सोपे होते.
पैसे काढण्याचे नियम – बेरोजगारीच्या परिस्थितीत, तुम्ही ७५% रक्कम त्वरित काढू शकता. उर्वरित २५% रक्कम एका वर्षानंतर काढता येईल. पण मुदतपूर्व पैसे काढल्यास व्याजाचा लाभ कमी होतो. पैसे तसेच ठेवणे चांगले आहे, जेणेकरून व्याज वाढत राहील.
५८ वर्षांनंतर – तुम्ही सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता. पैसे न काढल्यास, व्याज मिळणे थांबू शकते.
ऑनलाइन तपासा – तुमचे खाते उमंग ॲपवर किंवा ईपीएफओच्या वेबसाइटवर (epfindia.gov.in) तपासा. पासबुक डाउनलोड करा आणि व्याज पहा.
लहान खाती – ईपीएफओ लहान निष्क्रिय खाती स्वयंचलितपणे निकाली काढण्यासाठी एक योजना चालवत आहे.

ईपीएफमध्ये तुमचे पैसे ठेवणे सुरक्षित

ईपीएफमध्ये तुमचे पैसे ठेवणे सुरक्षित आहे. यात बँक एफडीपेक्षा चांगले व्याजदर मिळतात आणि सरकारची हमी असते. तुम्ही बेरोजगार असलात तरीही तुमचे पैसे वाढत राहतात. मुदतीपूर्वी पैसे काढल्यास चक्रवाढीचा फायदा कमी होतो. तुम्ही नोकरी करत नसलात तरीही तुमचे खाते सक्रिय ठेवा. तसेच, तुमचे पासबुक नियमितपणे तपासा. तुम्हाला काही समस्या आल्यास, EPFO ​​हेल्पलाइन किंवा तुमच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधा. नवीन नोकरी मिळताच तुमचा UAN ताबडतोब लिंक करा.

होर्मुज संकट आणि गॅस टंचाईतही आमची Mumbai सुसाट; मेल-एक्स्प्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ

Web Title: Latest no job and no epf deposit can your epfo balance earns interest details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Business News
  • EPFO
  • EPFO 3.0
  • EPFO Pension
  • Job
  • Marathi News
  • PF

संबंधित बातम्या

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान
1

‘बँका केवळ कर्ज देणाऱ्या संस्था नाहीत’, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचं मोठं विधान

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
2

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज
3

Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती; असा कराल अर्ज

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना
4

Vibrant Goa Summit: उद्योगांना मिळणार जागतिक भरारी! ‘व्हायब्रंट गोवा समिट’मध्ये १,००० हून अधिक व्यावसायिक बैठका; निर्यातीला चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.