(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये ३४.४७ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास केला. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ किरकोळ असली तरी, संभाव्य आर्थिक परिणामांच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः परप्रांतीय कामगारांची ये जा सुरूच असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
प्रवासी महसुलातही जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली असून, तिकीट तपासणी मोहिमा, विनातिकीट प्रवाशांवर कारवाई तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासातील वाढ यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही मुंबईकडे होणारी ये-जा कायम असल्याचे चित्र आहे.
मार्च 2025 हा महसूल 328 कोटी रुपये इतका होता.
मार्च 2026 मध्ये हा महसूल 304 कोटी रुपये इतका झाला आहे.
जागतिक परिस्थिती बेताची असतानाही जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली असून ३४.४७ लाखाहून अधिक प्रवास झाला आहे.
गॅस टंचाई आणि रोजगारावर परिणाम होईल या भीतीमुळे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मेल-एक्सप्रेस प्रवाशांची संख्या स्थिर राहिल्याने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्च २०२६ मध्ये ३४.४७ लाख प्रवाशांनी मेल एक्स्प्रेस गाड्यांतून प्रवास केला, तर मार्च २०२५ मध्ये ही संख्या ३४ लाख होती. त्यामुळे सुमारे १.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गॅसटंचाईच्या चर्चानंतरही प्रवासी संख्येत घट न होता उलट वाढ झाली आहे.






