(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुंबई : 30 जून 2026 ही तारीख सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक आणि करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण 1 जुलै 2026 पासून काही महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे काही आवश्यक कामे 30 जूनपूर्वी पूर्ण न केल्यास आर्थिक नुकसान, दंड किंवा सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी न केल्यास गॅस सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे.
ग्राहक आपल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा अधिकृत ऑनलाइन सुविधेद्वारे घरबसल्या e-KYC पूर्ण करू शकतात.
Home Loan : EMI मुळे खिशावर ताण येतोय? घर खरेदीपूर्वी ‘या’ चुका टाळाच, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असली तरी 30 जूननंतर कर विभागाच्या काही प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकतात. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, फॉर्म 16, टीडीएस तपशील आणि इतर करसंबंधित माहिती वेळेत तयार ठेवणे करदात्यांसाठी आवश्यक आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात. नुकतीच दरवाढ झाल्यामुळे 1 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत मोठा बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. मात्र, तेल कंपन्यांच्या निर्णयानुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो.
30 जूनची मुदत संपल्यानंतर काही सेवांमध्ये अडथळे येण्याची किंवा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत.






