Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा वाढल्या… LPG सिलिंडरच्या किमती दुप्पट; जानेवारीपासून 7 वेळा दरवाढ, जाणून घ्या ताजे दर

मेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. तेल आणि वायू संकटांमुळे देशभरात एलपीजीचा तुटवडाही आता तीव्र स्वरुप घेतो आहे. पण वाढत्या किमतींच्या बोज्यापासून घरगुती ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्यात तरिही दरवाढ होतच आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 01, 2026 | 11:47 AM
(फोटो सौजन्य: Pinterest)

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

LPG Price Hike 1st June: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. तेल आणि वायू संकटांमुळे देशभरात एलपीजीचा तुटवडाही आता तीव्र स्वरुप घेतो आहे. पण वाढत्या किमतींच्या बोज्यापासून घरगुती ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत; या उपाययोजनांमध्ये उत्पादनात वाढ करणे, तसेच बुकिंगशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करणे या सगळ्याचा समावेश आहे. पण या सगळ्यांमध्येही सिलेंडरच्या किंमती मात्र आटोक्यात नाही. आताही सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. नेमकी किती वाढ झाली आहे. जाणून घेऊयात.

Virat Kohli एका Instagram पोस्टमधून कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी रुपये! आकडा ऐकून थक्क व्हाल

किंमतींमध्ये अविरत वाढ

घरगुती सिलेंडरमध्ये ही वाढ न होता व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सना मात्र किमतींमधील अविरत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना याचा जोरदार फटका बसताना दिसत आहे. जानेवारी महिन्यापासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. दर महिन्याला या सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

किंमतींमध्ये किती प्रमाणात वाढ?

१ जून २०२६ रोजी किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली, ज्यामुळे दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडर्स प्रत्येकी ४२ रुपयांनी अधिक महाग झाले. व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमतींमधील या वाढीमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे; हे व्यवसाय आधीच गॅसच्या तुटवड्याशी झुंज देत असताना त्यात होणारी दरवाढ ही दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती उभी करत आहे. असे असले तरी, १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किमती स्थिर ठेवून तेल कंपन्यांनी सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट संतुलित राखण्यास मदत केली आहे.

किमतींमध्ये सलग सातव्यांदा वाढ

२०२६ च्या सुरुवातीपासून, व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सलग सातव्यांदा वाढ झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका देत, तेल विपणन कंपन्यांनी दिल्लीपासून कोलकातापर्यंतच्या विविध शहरांमध्ये १९-किलोच्या एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये ₹४२ ते ₹५३.५० दरम्यान वाढ केली आहे. या दरवाढीनंतर, नवी दिल्लीमध्ये एका व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ₹३,११३.५० झाली आहे; तर कोलकातामध्ये ही किंमत आता ₹३,२५५.५० वर पोहोचली असून, या शहरात ₹५३.५० ची वाढ नोंदवली गेली आहे.

जानेवारीपासून किमती जवळपास दुप्पट

या वर्षाच्या सुरुवातीपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये होत असलेल्या सततच्या वाढीमुळे, १९ किलोच्या LPG सिलिंडरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. हे या गोष्टीवरून स्पष्ट होते की, डिसेंबर २०२५ मध्ये म्हणजेच मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दिल्लीमध्ये एका सिलिंडरची किंमत ₹१,५८०.५० इतकी होती; १ जूनपर्यंत ही किंमत वाढून ₹३,११३.५० पर्यंत पोहोचली.

हा कल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या किंमतवाढीचा महिना-दर-महिना झालेला क्रम पाहूया.

महिना व्यावसायिक सिलिंडरची किंमत वाढ
जानेवारी ₹१,६९१.५० ₹१११
फेब्रुवारी ₹१,७४०.५० ₹४९
मार्च ₹१,७६८.५० ₹२८
मार्च (७ मार्च) ₹१,८८३.०० ₹११४.५०
एप्रिल ₹२,०७८.५० ₹१९५.५०
मे ₹३,०७१.५० ₹९९३
जून ₹३,११३.५० ₹४२

Credit Card धारकांनो Alert! ‘या’ चुकीमुळे तुमचे कार्ड होईल कायमस्वरुपी ब्लॉक; पाहा काय आहे नवीन नियम?

Web Title: Lpg gas cylinder price hike january to june updated rates see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Business News
  • LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • LPG Gas Crisis
  • LPG Shortage
  • LPG Supply
  • Marathi News

संबंधित बातम्या

पुढील आठवड्यात Share Market मध्ये तेजी येणार की मंदी? ‘हे’ मोठे घटक ठरवणार मार्केटची पुढची दिशा
1

पुढील आठवड्यात Share Market मध्ये तेजी येणार की मंदी? ‘हे’ मोठे घटक ठरवणार मार्केटची पुढची दिशा

गुंतवणूकदारांची लॉटरी! ‘हा’ Multibagger शेअर देणार बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका
2

गुंतवणूकदारांची लॉटरी! ‘हा’ Multibagger शेअर देणार बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका

Virat Kohli एका Instagram पोस्टमधून कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी रुपये! आकडा ऐकून थक्क व्हाल
3

Virat Kohli एका Instagram पोस्टमधून कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी रुपये! आकडा ऐकून थक्क व्हाल

Air Pollution : आता श्वास घेणंही धोकादायक?  ‘प्रदूषित हवा ठरतेय सायलेंट किलर’ ; WHO गंभीर इशारा
4

Air Pollution : आता श्वास घेणंही धोकादायक? ‘प्रदूषित हवा ठरतेय सायलेंट किलर’ ; WHO गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.