Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBI ॲक्शन मोडवर! Anil Ambani यांच्या अडचणीत मोठी वाढ, 27000 कोटींचा घोटाळ्याप्रकरणी दिल्ली-मुंबईसह 15 ठिकाणांवर छापेमारी

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. तब्बल २७,००० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने अनिल अंबानींच्या कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. CBI च्या पथकांनी मुंबई, दिल्लीसह देशभरातील १५ वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी सुरू केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 19, 2026 | 12:17 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CBI ॲक्शन मोडवर!
  • Anil Ambani यांच्या अडचणीत मोठी वाढ
  • दिल्ली-मुंबईसह 15 ठिकाणांवर छापेमारी
CBI On Action Mode : अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स एडीए समुहाविरोधी कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. CBI ने शनिवारी मुंबई आणि दिल्लीतील 15 ठिकाणी छापे टाकत घोटाळ्याच्या तपासास पुढील दिशा दिली. रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Smart Money Habits: मुले खूप हट्ट करतात का? पैशांची किंमत समजण्यासाठी त्यांना आजच शिकवा मनी मॅनेजमेंटचे हे 5 सोपे नियम!

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या छाप्यांदरम्यान रिलायन्स एडीए ग्रुपशी संबंधित २३ परस्परसंबंधित संस्थांची चौकशी करण्यात आली. असा आरोप आहे की, RCFL आणि RHFL ने घेतलेली बँक कर्जे ग्रुपच्या इतर कंपन्यांकडे वळवण्यासाठी या संस्थांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांना मोठे आर्थिक नुकसान झाले.

माजी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवरही छापे

तपास यंत्रणेने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे ​​माजी मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), रिलायन्स एडीए ग्रुपचे माजी सेक्रेटरियल हेड आणि आरएचएफएलचे माजी मुख्य ट्रेझरी कन्सल्टंट यांच्या निवासस्थानांचीही झडती घेतली.
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जारी केलेल्या शोध वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सीबीआयने सांगितलं आहे. या झडतीदरम्यान अनेक महत्त्वाचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे पुरावे देणारे दस्तऐवज जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

२७,३३७ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची चौकशी

विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC यांच्याकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे सीबीआयने यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड RCom, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड RHFL, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड RCFL आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड RTL यांच्या विरोधात सात FIR नोंदवले होते. या सात प्रकरणांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि LIC ला अंदाजे २७,३३७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

३८ ठिकाणी छापेमारी

रिलायन्स एडीए ग्रुपशी संबंधित प्रकरणांमध्ये सीबीआयने यापूर्वी ३८ ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. एजन्सीने चार आरोपपत्रे दाखल केली असून सात आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू

CBI ने म्हटले आहे की, या प्रकरणांचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. एजन्सीने म्हटले आहे की, ती निष्पक्ष, व्यापक आणि जलद तपासासाठी कटिबद्ध आहे. सध्या, धाडीदरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहावं लागले.

Sonam Wangchuk: उपोषणामुळे चर्चेत असलेले सोनम वांगचुक पैसे कसे कमवतात? किती आहे त्यांची एकूण नेटवर्थ?

Web Title: Major escalation in anil ambanis troubles cbi conducts raids at 15 locations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • anil ambani
  • Business News
  • CBI
  • Marathi News
  • Reliance
  • reliance group
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
3

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
4

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.