उत्पादन विकास, उत्पादन क्षमतावाढीसाठी मारुत ड्रोनने उभारला 6.2 मिलियन डॉलर सीरीज ए निधी!
निर्मिती आणि प्रशिक्षणासाठी डीजीसीए प्रमाणपत्र असलेली आघाडीची ड्रोन टेक्नॉलॉजी कंपनी मारुत ड्रोनटेक प्राइवेट लिमिटेडने लोक कॅपिटलकडून 6.2 मिलियन डॉलर सीरीज ए निधी उभारला आहे. ड्रोन तंत्रज्ञानातील नवकल्पनेत पुढे असलेले मारुत ड्रोन विविध क्षेत्रांमध्ये ड्रोनचा अवलंब वाढविण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करत आहे.
लोक कॅपिटलची मारुत ड्रोनमधील गुंतवणूक हे तंत्रज्ञान आधारित अन्न व कृषी व्यवसाय मॉडेलला समर्थन देण्याच्या त्याच्या वचनबद्धतेला पुष्टी देते. मारुतच्या पुढाकाराचा प्रभाव केवळ व्यक्तींपुरता मर्यादित नाही. तर सक्रिय दृष्टिकोन टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये आर्थिक क्रियाकलाप वाढवेल आणि तळागाळातील ग्रामीण समुदायांमध्ये उद्योजकता आणि आर्थिक स्वातंत्र्याला चालना देईल.
मारुत ड्रोन निधीचा वापर काही प्रमुख उपक्रमांवर करणार आहे. ज्यात ग्राहकांच्या गरजेनुसार विकसित प्रगत कृषी ड्रोन, ग्रामीण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी टियर 2-3 शहरांमध्ये आपल्या चॅनल पार्टनर नेटवर्क आणि सेवा केंद्रांचे विस्तार, आणि ड्रोन-अॅज-अ-सर्व्हिस देण्यासाठी भागीदारी पद्धतीने ड्रोन कृषी सेवा हब्सची स्थापना यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – क्रिकेटचा किंग विराट कोहली कमाईतही आहे अव्वल, 1000 कोटींहून अधिक संपत्तीचा आहे मालक!
कंपनी विविध विभागांमध्ये व्यावसायिकांची भरती, ड्रोन उद्योजकतेला प्रोत्साहन, प्रशिक्षित व्यावसायिक तयार करण्यासाठी १७ नवीन ड्रोन अकॅडमी सुरू करणे आणि भारतातील अग्रगण्य संस्थांसोबत भागीदारीत संशोधन आणि विकास प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठीही नियोजन करत आहे. ज्यात थेट बियाणे पेरणी आणि पीक निरीक्षण यांसारख्या प्रगत अनुप्रयोगांचा समावेश आहे.
या प्रसंगी बोलताना, लोक कॅपिटलचे संचालक हरी कृष्णन यांनी या रूपांतरणात्मक गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त केला आहे, “शेतकऱ्यांसाठी आणि व्यापक ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी उपाय आणण्यासाठी मारुतच्या टीमसोबत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. कृषीसाठी ड्रोन हे एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे जे पिकांचे आरोग्य राखण्यास, पाण्याची बचत करण्यास, मातीच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास, रसायनांचा संपर्क टाळण्यास, शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यास आणि गावपातळीवरील उद्योजकांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आमची कंपनीतील गुंतवणूक बाजार विस्तार, नवीन तंत्रज्ञान नवकल्पना आणि स्वदेशी उत्पादन प्रयत्नांना समर्थन देईल,” असेही ते म्हणाले आहे.
मारुत ड्रोनचे सीईओ आणि सहसंस्थापक प्रेम कुमार विस्लावथ म्हणाले आहे की, “या निधी उभारणीबद्दल आम्ही उत्साहित आहोत आणि एकसारख्या विचारसरणीच्या गुंतवणूकदारांना सोबत आणल्याबद्दल आनंदी आहोत. ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक भारतीय शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या आणि विविध क्षेत्रांतील संस्थांसाठी ड्रोन-आधारित सेवा एकत्रित करण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळकट करते. या नवीन भांडवलामुळे आम्हाला आमच्या टीममध्ये गुंतवणूक करण्यास, वार्षिक ३,००० ड्रोन उत्पादनाची क्षमता वाढविण्यास, आणि जलद गतीने वाढत राहण्यासाठी विपणनावर भर देऊन पुढील पाच वर्षांत १००० कोटी रुपयांच्या महसूल लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळेल.”
मारुत ड्रोन ही भारतातील अग्रगण्य ड्रोन तंत्रज्ञान उत्पादक कंपनी आहे. जिचे उद्दिष्ट आहे ड्रोन-आधारित उपायांद्वारे सामाजिक समस्यांचे निराकरण करणे आहे. २०१९ मध्ये तीन आयआयटी माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेले, मारुत ड्रोन पुरेसा, वैविध्यपूर्ण आणि सुरक्षित अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतीला पुढे नेण्यासाठी आणि पुढील शतकातील कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहेत.