"माझे नाव घेऊ नका...", हिंडनबर्ग रिसर्चच्या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर मजेदार मीम्स व्हायरल!
अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने आज (ता.10) सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात हिंडनबर्गने म्हटले आहे की, ‘भारतात लवकरच काही तरी मोठे घडणार आहे’. मात्र, हिंडनबर्ग रिसर्चकडून नेमका कोणता खुलासा केला जाणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, अशातच आता समाजमाध्यमांवर लोक सध्या एकमेकांना विचारत आहे की, आता नेमका कोणाचा नंबर लागणार आहे? इतकेच नाही तर हिंडनबर्ग रिसर्चच्या ‘एक्स’ पोस्टनंतर वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
समाजमाध्यमांवर मीम्स व्हायरल
परिणामी, सध्या समाजमाध्यमांवर #Hendenburg टॅग टॉप ट्रेंडिंगवर आला आहे. एका युजर्सने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “भारतातील अब्जाधीश तयार राहा, जे काही पुढे होणार असेल त्यासाठी” तर अन्य एका युजरने पंचायत 3 चा मीम्स शेअर करत म्हटले आहे की, भारतीय अब्जाधीश सध्या विचार करत असतील की, “माझे नाव नका घेऊ’.
Who do you think is next 🤔In India#Hindenburg pic.twitter.com/IcwLwzQdar
— Ruksar Khan (@Ruksar_Khan7) August 10, 2024
Indian Billionaires get ready. Who will be the Next Opponent. #Hindenburg pic.twitter.com/xgRTmNPsvV
— Rajeshwari Iyer (@RajeshwariRW) August 10, 2024
#Hendenburg हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगवर
तर एका शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आधीच शेअर बाजार लाल निशाणीवर व्यवहार करत आहे. आता तुम्हाला काय हवंय भाऊ. तर शेअर बाजारातील अन्य एका युजरने म्हटले आहे की, “भाऊ माझे पैसे अर्धे करू नका”. दरम्यान, या मीम्समुळे समाजमाध्यमांवर #Hendenburg हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
#Hindenburg: Something big soon India
Indian stock market to Hindenburg: pic.twitter.com/ysra7jG91B
— Sir-kid (@ooobhaishab) August 10, 2024
मेरे पैसे आधे मत कर देना 😭#Hindenburg pic.twitter.com/t2a56BHyEx
— Raja Babu (@GaurangBhardwa1) August 10, 2024
हेही वाचा : भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चची एक पोस्ट, अन् चर्चांना उधाण!
काय आहे संपूर्ण प्रकरण?
24 जानेवारी 2023 रोजी अर्थात मागील वर्षी उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्यांविषयी अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने १०६ पानी अहवाल सादर करत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने शेअर्सचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. याशिवाय अन्य आरोप देखील करण्यात आले होते.
ज्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू झाली होती. एकंदर १२५ अब्ज डॉलरच्या आसपास बाजारमूल्याचा फटका समूहाला बसला होता. त्यानंतर आता ‘भारतात लवकरच काही तरी मोठे घडणार आहे’ असे ‘एक्स’प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हिंडनबर्ग रिसर्चने म्हटले आहे. ज्यामुळे सध्या आता नेमका कोणाचा नंबर लागणार आहे? अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे.