फोटो सौजन्य: Gemini
RRB कडून आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण 312 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर – 202 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली जाणार आहे. तसेच चीफ लॉ असिस्टंटसाठी 22 पदे, पब्लिक प्रॉसिक्युशनसाठी 7 पदे, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टरसाठी 15 पदे, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टरसाठी 24 पदे. तसेच तांत्रिक व वैज्ञानिक श्रेणीत सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंगसाठी 2 पदे, लॅब असिस्टंट ग्रेड-3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) साठी 39 पदे, सायंटिफिक सुपरवायझरसाठी 1 पद,
अशी पदे भरली जाणार आहेत.
Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी! ‘या’ तीन राज्यांमध्ये नोकरीसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज
या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन दिले जाईल. बहुतांश पदांसाठी 35,400 प्रति महिना वेतन मिळेल. चीफ लॉ असिस्टंट सारख्या वरिष्ठ पदांसाठी 44,900 प्रति महिना पर्यंत वेतन दिले जाईल. याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर सुविधा मिळणार असल्याने एकूण मासिक उत्पन्न अधिक वाढेल.






