फोटो सौजन्य- iStock
मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने ‘मिरे अॅसेट लाँग ड्युरेशन फंड’ची (पोर्टफोलिओचा मॅकॉले कालावधी ७ वर्षांहून अधिक राहील अशा पद्धतीने उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणारी एक ओपन-एण्डेड डेट योजना. यात व्याजदराची घोषणा केली आहे. न्यू फंड ऑफर (एनएफओ) सुरु झाली असून २ डिसेंबर, २०२४ रोजी बंद होईल. एएमएफआय टीयर वन बेंचमार्क अर्थात क्रिसिल लाँग ड्युरेशन डेट ए-थ्री इंडेक्स या फंडासाठी मापदंड म्हणून उपयोगात आणला जाईल आणि फंडाचे व्यवस्थापन फंड व्यवस्थापक व फिक्स्ड इन्कम अॅनालिस्ट कृती छेता करतील.
मिरे अॅसेट लाँग ड्युरेशन फंड
व्याजदरांतील बदलांचा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांना डोळ्यापुढे ठेवून मिरे अॅसेट लाँग ड्युरेशन फंडाची रचना करण्यात आली आहे, फंड प्रामुख्याने सरकारी सिक्युरिटींमध्ये तसेच कॉर्पोरेट रोखे व एसडीएल यांसारख्या अन्य डेट अॅसेट्समध्ये गुंतवणूक करेल. पोर्टफोलिओतील एकंदर डेट वितरणामध्येच काही वितरण युक्तीने करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा फंड आदर्श आहे. घटत्या व्याजदरांच्या वातावरणात, प्रचलित उत्पन्न कमावून, गुंतवणूकदारांना भांडवली नफ्याचे संभाव्य लाभ प्राप्त करण्याची अनन्यसाधारण संधी मिळवून देण्याचे उद्दिष्ट फंडापुढे आहे. शिवाय, अन्य पारंपरिक साधनांमध्ये गुंतवणूकदाराकडून नियमितपणे कर आकारला जात असताना, गुंतवणूकीच्या विमोचनाच्या वेळी (सोडवून घेताना) कर आकारणी करणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला करविलंबाचा* लाभही हा फंड मिळवून देऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळात गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ अधिक कार्यक्षमतेने वाढवू शकतात.
मिरे अॅसेट लाँग ड्युरेशन फंड प्रामुख्याने उच्च रेटिंग असलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो, यामध्ये दीर्घ परिपक्वता कालावधी असलेल्या सरकारी सिक्युरिटी, ट्रिपल ए रेटिंग असलेले कॉर्पोरेट रोखे आणि अन्य डेट साधनांचा समावेश होतो. मॅकोले कालावधी सात वर्षांहून अधिक राखून, दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टाशी जोडून घेण्याचा प्रयत्न हा फंड करतो.
ही योजना ९ डिसेंबर, २०२४ रोजी सलग विक्री व फेरखरेदीसाठी पुन्हा खुली होणार आहे. या योजनेत एनएफओदरम्यान रुपये ५,०००/- (पाच हजार रुपये) किमान प्रारंभिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे, त्यानंतरची गुंतवणूक १ रुपयाच्या पटीत करता येईल.
मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख गुंतवणूक अधिकारी महेंद्रकुमार जाजू एनएफओ जाहीर करताना म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रस्थापित झालेल्या डेट उत्पादनांच्या दमदार पायावर उभ्या असलेल्या मिरे अॅसेट लाँग ड्युरेशन फंडामुळे आमची उत्पादनश्रेणी अधिक व्यापक झाली आहे, याद्वारे ग्राहकांना वैविध्यपूर्ण निवडीची संधी देऊ केली जाऊ शकत आहे. भारताची रचनात्मक वाढ अधिकाधिक भक्कम होत आहे याचा अर्थ जागतिक कलानुसार उत्पन्न घटीचा प्रवाह दीर्घकाळासाठी राहू शकतो. या दीर्घकालीन अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा फंड विचारपूर्वक विकसित करण्यात आला आहे.”
वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून गुंतवणूकदार या फंडाचा विचार करू शकतात
मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या फंड व्यवस्थापक व फिक्स्ड इन्कम अॅनालिस्ट श्रीमती कृती छेता या फंडाबद्दल म्हणाल्या, “स्थिर वाढ व घटती महागाई यांच्या पार्श्वभूमीवर भारत एक रचनात्मक गाथा लिहिण्यासाठी पुढील पाऊल टाकण्यास सज्ज आहे. भारताने आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांच्या जवळ जाण्यासाठी आणखी एक पाऊल टाकले म्हणजे व्याजदरांची चौकट नव्याने तयार होऊन व्याजदरांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. मिरे अॅसेट लाँग ड्युरेशन फंड हा दीर्घकाळाच्या दृष्टीने विकसित करण्यात आला आहे, उच्च दर्जाच्या साधनांमध्ये गुंतवणून करून तो गुंतवणूकदारांना वर्तमान दरांचा लाभ घेण्याची संधी देतो. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून गुंतवणूकदार या फंडाचा विचार करू शकतात, विशेषत: ज्यांना जोखीम व मोबदला यांच्यात समतोल साधत, व्याजदर चक्रांचे व्यवस्थापन प्रभावीरित्या करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा फंड उत्तम आहे. एक खात्रीशीर उत्पन्न स्रोत प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड एक अत्यावश्यक घटक म्हणून काम करू शकेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.”