Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara News : मोठ्ठा घोळ… गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विमा घोटाळा, 17 हेल्थ क्लेमद्वारे कंपनीची फसवणूक

Nalasopara News : नालासोपारा पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये बनावट वैद्यकीय कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे तब्बल १० लाख २१ हजार रुपयांचा विमा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रत्यक्ष उपचार न झालेल्या १७ रुग्णांच्या नावावर दावे सादर करून बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 31, 2026 | 04:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विमा घोटाळा;
  • बनावट उपचार नोंदी, खोट्या स्वाक्षऱ्या
  • १७ हेल्थ क्लेमद्वारे कंपनीची फसवणूक
Nalasopara News : नालासोपारा पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांसह चार जणांविरोधात तब्बल १० लाख २१ हजार रुपयांच्या विमा घोटाळ्याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट वैद्यकीय ९२० कागदपत्रे, बोगस स्वाक्षऱ्या आणि उपचार न झालेल्या रुग्णांच्या नावावर हेल्थ इन्शुरन्सचे दावे सादर करून बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडची फसवणूक केल्याप्रकरणी या चौघांवर करण्यात आला आहे. गॅलेक्सी हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहणारे पूजा खान, डॉ. गौरव शर्मा, डॉ. इम्रान खान आणि रजनीश होशियार सिंह यांनी संगनमताने हा प्रकार केला. या प्रकरणी बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे बँच ऑपरेशन्स अँड सर्व्हिस मॅनेजर चेतन नंदू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gold Jewellery Sales : लोकांनी बंद केली सोन्याच्या दागिन्यांची खरेदी? विक्रीत मोठी घट; काय आहेत नेमकी कारणं?

विमा घोटाळ्याचा तपास

कंपनीच्या इन्व्हेस्टिगेशन अँड लॉस मिटिगेशन विभागाने संशयास्पद दाव्यांची चौकशी सुरू केल्यानंतर गरुडा हेल्थक्लेम सर्व्हिसेस या संस्थेमार्फत ऑडिट करण्यात आले. त्यावेळी २०२४ ते २०२६ या कालावधीत १७ रुग्णांच्या नावावर दाखल करण्यात आलेल्या हेल्थ क्लेममध्ये गंभीर अनियमितता आढळून आली, याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक सचिन उबाळे पुढील तपास करत आहेत. पोलिसांकडून या विमा घोटाळ्याचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, याच पद्धतीने इतर विमा कंपन्यांकडेही दावे करण्यात आले होते का, या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

पॅथॉलॉजिस्टच्या स्वाक्षऱ्यांत तफावत

ऑडिटमध्ये उपचार करणारे म्हणून नमूद असलेले डॉ. एम. पी. राव यांनी संबंधित १७ रुग्णांवर आपण कोणतेही उपचार केले नसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय रक्त आणि लघवी तपासणी अहवालांवरील पॅथॉलॉजिस्टच्या स्वाक्षऱ्यांमध्येही तफावत आढळली. त्यामुळे वैद्यकीय कागदपत्रे बनावट तयार करून विमा कंपनीकडून दावे मंजूर करून घेतल्याचा संशय अधिक बळावला.

बनावट कागदपत्रे

तपासात संबंधित १७ क्लेमच्या आधारे १० लाख २१ हजार ९२० रुपयांची रक्कम बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीकडून हॉस्पिटलच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे. या सर्व व्यवहारात डॉक्टरांसह इतर आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रांचा वापर करून आर्थिक लाभमिळवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!

Web Title: Nalasopara news galaxy hospital insurance fraud case marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Nalasopara
  • nalasopara news
  • palghar

संबंधित बातम्या

Gold Jewellery Sales : लोकांनी बंद केली सोन्याच्या दागिन्यांची खरेदी? विक्रीत मोठी घट; काय आहेत नेमकी कारणं?
1

Gold Jewellery Sales : लोकांनी बंद केली सोन्याच्या दागिन्यांची खरेदी? विक्रीत मोठी घट; काय आहेत नेमकी कारणं?

Chandrapur News: चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर; 10 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद, जनजीवन विस्कळीत
2

Chandrapur News: चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर; 10 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद, जनजीवन विस्कळीत

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप
3

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!
4

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.