दक्षिण आफ्रिकेचा ३-० असा दणदणीत पराभव(फोटो-सोशल मीडिया)
India’s series victory in the Under-19 category : भारत १९ वर्षांखालील आणि दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेची सांगता भारताच्या विजयाने झाली. युवा एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, भारतीय १९ वर्षांखालील संघाने २३३ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० अशी आपल्या खिशात घातली. या मालिका विजयात महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या आणि भारताची धुरा वाहणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
हेही वाचा : विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO
बिनोनी येथील विलोमूर पार्क येथे बुधवारी खेळवण्यात आलेल्या खेळल्या गेलेल्या सामन्यात, नाणेफेक गामाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून ३९३ धावा उभ्या केल्या. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अनुकूल परिस्थितीचा चांगलाच फायदा घेतला आणि यजमानांच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार संचार घेतला. तो भारतीय डावाच्या २६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या १२७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ९ चौकार आणि १० षटकार लगावले. यासह त्याने आरोन जॉर्जसोबत २२७ धावांची मोठी सलामी भागीदारी रचली. वैभव बाद झाल्यानंतर आरोन जॉर्जनेही आपले देखील शतक पूर्ण केले.
वैभव सूर्यवंशीने शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ६३ चेंडूंचा सामना केला. तसेच त्याने यापूर्वी फक्त २४ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले होते. वैभवने केलेल्या या खेळीकडे त्याच्या उज्ज्वल भविष्याची झलक पहिले जात आहे. तो लवकरच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवण्यास सज्ज असल्याचे हे चित्र दिसत आहे.
भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेचा संघ ३५ षटकात १६० धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेने ५० धावांत आपले पाच गडी गमावले. तेथून, डॅनियल बोसमनने पॉल जेम्स (४१) सोबत सहाव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण ते संघाला विजय मिळवून दिला. बोसमनने ६० चेंडूत ४० धावा केल्या, तर कॉर्नी बोथा ३६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून किशन कुमार सिंगने तीन बळी टिपले, तर मोहम्मद अननने दोन बळी घेतले, तर हेनिल पटेल, कनिष्क चौहान, उद्धव मोहन, आर एस अंबरिश आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
कर्णधार वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्याने या मालिकेत ११, ६८ आणि १२७ धावा फटकावल्या. वैभव सूर्यवंशीने मालिकेत एकूण २०६ धावा काढल्या आहेत.






