Stock Market Today: आज बाजारात तेजी की मंदी? ट्रेडर्ससाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
Todays Gold-Silver Price: सोनं लवकरच पार करणार 2 लाख रुपयांचा टप्पा, चांदीही गगनाला भिडली
गुरुवारी, भारतीय शेअर बाजाराने तेजीचा सपाटा लावला आणि सलग तिसऱ्या सत्रात त्याची तेजी वाढली, बेंचमार्क निफ्टी ५० ने २५,४०० ची पातळी पुन्हा मिळवली. सेन्सेक्स २२१.६ ९ अंकांनी म्हणजेच ०.२७% ने वाढून ८२,५६६.३७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ७६.१५ अंकांनी म्हणजेच ०.३०% ने वाढून २५,४१८.९० वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ३५९.०५ अंकांनी किंवा ०.६०% ने वाढून ५९,९५७.८५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार मीशो, एनटीपीसी, नेस्ले, बजाज ऑटो, टाटा इन्व्हेस्टमेंट, पॉवर ग्रिड, पेटीएम, आयटीसी, टाटा मोटर्स, वेदांत, स्विगी, डिक्सन टेक्नॉलॉजीज, डाबर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान एरोनॉटिक्स या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकणार आहेत. आजच्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना सावध भुमिका बाळगावी लागणार आहे. तसेच आगमी बजेटचा परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठीचे तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधरचे तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी एमसीएक्स, करूर वैश्य बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बीएसई, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प, संवर्धन मदरसन आणि टोरेंट पॉवर या आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे.






