फोटो सौजन्य: iStock
गेल्या अनेक वर्षांपासून देशात म्युचल फंड बाबत विशेष जागरूकता करण्यात आली. ज्यामुळे आज प्रत्येक जण म्युचल फंड सही है म्हणत म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करत आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग या गुंतवणुकीत जास्त सक्रिय आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक फिन इन्फ्ल्यूएंसर्स सुद्धा म्युचल फंडकडे लॉंग टर्मसाठी एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहतात. म्युचल फंडने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत.
आज प्रत्येक तरुण नोकरी लागल्यानंतर सर्वात पहिले SIP चालू करताना दिसतो. वेगवेगळ्या म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आपण अनेकदा ऐकत असतो. त्यामुळेच तर अगदी 100 रुपयांपासून आपल्याला म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करायला मिळते. आता लवकरच गुंतवणूकदारांना 250 रुपयांची SIP सुरु करता येणार आहे. SEBI ने याबाबत सकारत्मक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नक्कीच देशाची गुंतवणूक वाढणार आहे.
आता लवकरच हे शक्य होणार आहे की जर एखाद्या व्यक्तीला हवे असेल तर तो फक्त 250 रुपयांपासून SIP म्हणजेच मासिक गुंतवणूक योजनेअंतर्गत बचत सुरू करू शकेल. या संदर्भात, शेअर बाजार नियामक संस्था सेबी लवकरच सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.
सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. शेअर बाजारात अधिकाधिक देशांतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. याचा आर्थिक समावेशनावरही सकारात्मक परिणाम होईल. याचे कारण समाजातील एका मोठ्या वर्गाला बाजारातील तेजीचा फायदा होईल.
सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे एकूण 26,459 कोटी रुपये गुंतवले आहेत. तर नोव्हेंबर 2024 मध्ये एसआयपीद्वारे 24,320 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. ऑगस्ट 2016 मध्ये दरमहा म्युच्युअल फंडांमध्ये 3122 कोटी रुपये गुंतवले जात होते.
सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच म्हणाले, “250 रुपयांची एसआयपीमुळे संपूर्ण उद्योगाला (म्युच्युअल फंड इंडस्ट्री) मोठ्या प्रमाणात फायदा होईल. पुढील तीन वर्षांत भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला या निर्णयामुळे खूप मोठे प्रोत्साहन मिळेल.”
2025 मध्ये येऊ शकतात रेकॉर्डतोड IPO, 90 पेक्षा अधिक कंपन्यांचे ड्राफ्ट दाखल, अकाऊंटमध्ये पैसेही तयार
बूच म्हणाले की, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या प्रगतीमुळे आता व्यवहारांचा खर्च कमी करणे शक्य झाले आहे. म्हणूनच लहान गुंतवणुकीतूनही आर्थिक उत्पादने सुरू करणे शक्य होत आहे. एआयमुळे, कमी वेळात अधिकाधिक गुंतवणूक अर्जांवर प्रक्रिया करणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे कमी उत्पन्न गट किंवा कमी बचत गटात म्युच्युअल फंडांचा प्रसार होईल.