Manu Bhaker who won 2 medals in the Paris Olympic
ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय नेमबाजीपटू मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत भारताला पहिले पदक पटकावून दिले. ती ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिला महिला नेमबाजीपटू ठरली आहे. तिने ऑलिम्पिक २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ती चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र, आता नेमबाजीपटू मनू भाकेरबाबत अनेक प्रश्न समोर येत आहे. त्यातील एक प्रश्न म्हणजे मनू भाकेर नेमकी किती संपत्तीची मालकीण आहे? तिच्या संपत्तीबाबत अनेकांकडून प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण मनू भाकेरच्या एकूण संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत…
पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज
मनू भाकेर ही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारतासाठी 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये विजय कुमार याने सुवर्णपदक आणि गगन नारंग याने कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर आता मनू भाकेरने 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे. २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये ती पदक जिंकण्यात अयशस्वी ठरली होती. तर 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनुची पिस्तूल खराब झाली होती. ज्यामुळे तिला पदकाची कमाई करता आलेली नव्हती.
(फोटो सौजन्य : ‘एक्स’ हॅण्डल)
हेही वाचा : …क्रिकेट खेळणे सोडले, बिझनेसमध्ये पाऊल ठेवले; आज आहे अब्जावधींची संपत्ती!
किती संपत्तीची मालकीण आहे मनू भाकेर?
विविध मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, मनू भाकेरची एकूण संपत्ती ही जवळपास १२ कोटी इतकी आहे. तिच्या या संपत्तीमध्ये बक्षिसाची रक्कम आणि स्पॉनसर्सशिपची रक्कम देखील समाविष्ट आहे. मनू भाकेर यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकण्यात यशस्वी ठरली होती. ज्यानंतर तिला हरियाणा सरकारने दोन कोटींचे बक्षिस दिले होते. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी केंद्र सरकारने मनू भाकेरवर केंद्र सरकारने एकूण 1.7 कोटी रुपये इतका खर्च केला आहे.