फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री रश्मीका मंदना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांची लग्नगाठ अखेर बांधली गेली आहे. साता जन्माच्या या गाठी बांधताना त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे. केलेलं प्रेम जेव्हा आयुष्यभराची साथ देण्यासाठी आपल्या शेजारी बसलेला असतो त्यावेळी असणारा आनंद काही औरच असतो आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे रश्मीका आणि विजय ही दाक्षिणात्य जोडी! देशातील प्रत्येक चाहत्याची इच्छा होती की रश्मीका आणि विजयने एकत्र यावे आणि आज एका सुंदर शुभमुहूर्तावर ते दोघे खरंच एकत्र आले आहेत तेही साता जन्मासाठी!
दोघांनी राजस्थानमधील उदयपूर येथील एका हेरिटेज महालामध्ये हा सुंदर क्षण साजरा केला आहे. दाक्षिणात्य लग्न परंपरेनुसार दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या संपूर्ण सोहळ्यामध्ये काही कलाकार मंडळीही दिसून आली आहे. तसेच अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांना आशीर्वाद दिले आहेत. 4 मार्च 2026 रोजी त्या दोघांचा रिसेप्शन सोहळा हैद्राबाद येथे पार पाडणार आहे. लग्नाच्या काही तासानंतरच विजयने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून लग्नाच्या क्षणांची पोस्ट केली आहे आणि त्याखाली एक सुंदर कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये लिहले आहे की, “एक दिवस मला तिची खूप आठवण आली… ही आठवण अशी होती की जर ती माझ्यासोबत असती तर माझा दिवस आणखीन सुंदर झाला असता. ती सोबत असती तर जेवताना एक वेगळीच उब मिळाली असती. ती सोबत असती तर व्यायाम कमी आणि मज्जा जास्त वाटली असती. मला तिची गरज होती… मी कुठेही असलो तरी घरासारखी शांतता देण्यासाठी. म्हणूनच तर मी माझ्या बेस्ट फ्रेंडलाच माझी पत्नी बनवलं. 26.02.2026”
या संपूर्ण सोहळ्यात दोघांनी खूप उत्तम असा लुक केला होता. रश्मीकाने केसरी रंगाची साडी परिधान केली होती.






