सेन्सर टॉवरच्या ग्लोबल मोबाईल रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलं की, 2025 मध्ये सर्वाधिक डाउनलोड केलेले मोबाईल फोन,एआय अॅप-मधील खरेदी Chat GPT ची जास्त आहे. 2025 मध्ये चॅटजीपीटी डाउनलोड कॅटेगरीमध्ये 148 टक्के, अॅपमधील खरेदीत 248 टक्के आणि अॅपवर घालवलेल्या वेळेत 426 टक्के वाढ झाली.याचा अर्थ असा की लोक हे अॅप केवळ वेगाने डाउनलोड करत नाहीत तर प्रीमियम फॅसिलीटी पैसे देऊन त्यावर जास्त वेळ घालवत आहेत.याचा परिणाम असा की, ChatGPT गेल्या वर्षी सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप बनले असून जगभरात दुसऱ्या क्रमांकावर सध्या याचं स्थान आहे. या श्रेणीतील इतर अॅप्समध्ये Google Gemini, DeepSeek, DuaBio, Grok, Metai आणि Microsoft CoPilot यांचा देखील समावेश आहे.
सोशल मीडिया अॅप्सचे वर्चस्व कायम
एआय अॅप्सच्या या ट्रेंडमध्ये गेमिंग अॅप्स तेवढे मागे राहिले असले . य़ाचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं वर्चस्व देखील यात कायम आहे. गेल्या वर्षी, जगभरातील वापरकर्त्यांनी सोशल मीडिया अॅप्सवर 2.5ट्रिलियन तास गुंतवले असल्याची माहिती समोर आली आहे .याचा अर्थ असा की, प्रत्येक वापरकर्ता दररोज अंदाजे 90 मिनिटे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घालवतो, जो 2024 च्या तुलनेत 5 टक्के जास्त आहे. डाउनलोड, अॅप-मधील खरेदी आणि एकूण वेळ घालवण्याच्या बाबतीत टिकटॉक अजूनही अव्वल स्थानी आहे.
एआय अॅप्स डाउनलोड करण्यात भारत जगात अव्वल
जनरेटिव्ह एआय अॅप्स डाउनलोड करण्यात आणि चॅटबॉट्स वापरण्यात भारत जगात आघाडीवर आहे.जगभरातील सर्व अॅप डाउनलोडपैकी 20 टक्के एकट्या भारतात होतात, परंतु अॅप-मधील खरेदी आणि वापराच्या बाबतीत ते मागे आहे. याचा अर्थ असा की भारतातील लोक अॅप डाउनलोड केल्यानंतर प्रीमियम किंवा इतर वैशिष्ट्यांवर पैसे खर्च करत नाहीत. 2025 मध्ये, फक्त 1 टक्के भारतीय वापरकर्त्यांनी अॅप-मधील खरेदी केल्याची माहिती आहे.






