Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! भारतात Petrol-Diesel च्या किंमती उतरल्या, दरात तब्बल 3.1% ची घट, सरकारने स्पष्ट केलं संपूर्ण गणित

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण असं असताना भारत मात्र असा एकमेव देश आहे. जिथे इंधनाच्या किमती 3.1 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एका निवेदनानुसार स्पष्ट केलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 14, 2026 | 12:10 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण असं असताना भारत मात्र असा एकमेव देश आहे. जिथे इंधनाच्या किमती 3.1 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एका निवेदनानुसार, मे २०२२ ते मे २०२६ या कालावधीत भारतात इंधनाच्या किमती ३.१ टक्क्यांनी कमी झाली असल्याचं स्पष्ट केलं. पण आपल्याकडे तर इंधनाच्या किमती वाढतानाच दिसत आहे. मग सरकार असं का म्हणतंय? समजून घेऊयात.

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा गाठला नवा उच्चांक! 24 तासांत दरात इतकी वाढ; खरेदीदारांच्या चिंतेत भर

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत किमती वाढल्या

केंद्रीय मंत्र्यांनी प्रसिद्ध केलेली आकडेवारी स्पष्ट करत सांगितलं की, गेल्या चार वर्षांत पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर श्रीलंकेमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. इथं ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इटली आणि फ्रान्समध्येही अनुक्रमे ४६% आणि ४७% वाढ झाली आहे. अमेरिकेतही इंधनाच्या किमती ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, भारतात किमती सातत्याने कमी झाल्या आहेत. या चार वर्षांत भारतातील इंधनाच्या किमतीत ३.१% ची निव्वळ घट झाली आहे.

३.१% ची घट कशी काय?

सरकारने याबाबत स्पष्ट केलंय की, पश्चिम आशियातील अलीकडील तणावामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर प्रति बॅरलवरून १२२ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढले आहेत. या दरवाढीपासून जनतेच्या हिताचा विचार करावा आणि त्याच्यावर ओझं पडता नये म्हणून सरकारने वेळोवेळी अनेक उपाययोजना केल्या आहेत, जसे की पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर ३ रुपयांनी कमी करणे आणि डिझेलवरील शुल्क शून्य केले आहेत.

४ वर्षांत ३% पेक्षा जास्त घट

जागतिक परिस्थितीमुळे वाढलेल्या किमतींच्या धक्क्यापासून जनतेचे संरक्षण व्हावं यासाठी सरकारने कर कपातीच्या स्वरूपात दरवर्षी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुलाचा भार उचलला आहे. किरकोळ स्तरावर इंधनाच्या किमती वाढू नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे सरकारी तेल कंपन्यांनाही लक्षणीय तोटा सहन करावा लागला आहे. देशांतर्गत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या काही आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खरोखरच वाढल्या आहेत, पण दीर्घकाळात, ४ वर्षांत ३% पेक्षा जास्त घट झाल्याचं सुचित करत आहे.

सरकारचा नवीन नियम

औद्योगिक किंवा घाऊक खरेदीदारांकडून होणारा काळाबाजार आणि किरकोळ पेट्रोल पंपांवरून स्वस्त डिझेलची अफरातफर रोखण्यासाठी, तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी इंधनाच्या साठ्याची कमतरता भासू नये यासाठी सरकारने प्रति वाहन दररोज २०० लिटर डिझेलची मर्यादा देखील निश्चित केली आहे.

दारूच्या बाजारपेठेत भारताचा दबदबा! आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री घटत असताना भारतीय लिकर इंडस्ट्रीने घेतली मोठी भरारी

Web Title: Petrol and diesel prices decline 3 1 percent in india government explains data see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • America
  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Ethanol Petrol
  • Marathi News
  • petrol price today

संबंधित बातम्या

NTT DATA चे ADAPTIS लॉन्च! भारतीय व्यवसायांसाठी स्मार्ट पेमेंट्स आणि कॉमर्सचा नवा अध्याय
1

NTT DATA चे ADAPTIS लॉन्च! भारतीय व्यवसायांसाठी स्मार्ट पेमेंट्स आणि कॉमर्सचा नवा अध्याय

Metaचे आर्थिक निकाल जाहीर, अपेक्षित यश नाही; तरी AI वर अब्जावधींची गुंतवणूक कायम
2

Metaचे आर्थिक निकाल जाहीर, अपेक्षित यश नाही; तरी AI वर अब्जावधींची गुंतवणूक कायम

Gold Silver Price Today: आज चांदीचा भाव उतरला तर सोन्याचा भाव वधारला; 22K सोन्याचा दर नक्की किती?
3

Gold Silver Price Today: आज चांदीचा भाव उतरला तर सोन्याचा भाव वधारला; 22K सोन्याचा दर नक्की किती?

Maharashtra Breaking News Live Updates Today:  शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.