Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol – Diesel च्या वाढत्या किमतींचा फटका! आता ’10 मिनिटांची’ Online Delivery ही महागणार

देशभरातील जवळपास प्रत्येक घरामध्ये '१०-मिनिटांची स्पीड डिलीव्हरी' सगळीकडेच उपलब्धा आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर घराबाहेर निघण्याची गरज भासत नाही. काही मिनिटांत आपलं काम सहज आणि सोपं होऊन जातं. पण आता या सहज सोप्या कामासाठी जास्त मोबदला द्यावाल लागणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 20, 2026 | 07:55 PM
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

Petrol Diesel Price Hike Impact : देशभरातील जवळपास प्रत्येक घरामध्ये ‘१०-मिनिटांची स्पीड डिलीव्हरी’ सगळीकडेच उपलब्धा आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर घराबाहेर निघण्याची गरज भासत नाही. काही मिनिटांत आपलं काम सहज आणि सोपं होऊन जातं. पण आता या सहज सोप्या कामासाठी जास्त मोबदला द्यावाल लागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता या कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे. अलीकडेच, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर सुमारे ३ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम या सेवांवरही होणार आहे.

SIP नेहमीच फायदेशीर नसते? Mutual Fund कंपन्या ‘या’ 5 गोष्टी तुमच्यापासून नेहमी लपवतात; Investment पूर्वी नक्की वाचा

‘एलारा कॅपिटल’च्या एका अहवालानुसार, भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे. या परिस्थितीमुळे Delivery Partners कमाईवर दबाव येईल आणि संबंधित प्लॅटफॉर्म्सना आपला परिचालन खर्च वाढवण्यास भाग पडू शकते.

इंधन दरवाढीचा कामकाजावर परिणाम

‘क्विक कॉमर्स’ क्षेत्रात, वितरणाचा सरासरी खर्च प्रति ऑर्डर ₹३५–५० इतका असतो; तर Food Delivery क्षेत्रात हा खर्च साधारणपणे ₹५५–६० च्या दरम्यान असतो. एका अहवालानुसार, Zomato साठी वितरणाचा सरासरी खर्च प्रति ऑर्डर अंदाजे ₹४५ आहे, तर ‘Swiggy’ साठी तो प्रति ऑर्डर ₹५५ इतका आहे. वितरणाच्या एकूण खर्चापैकी साधारणपणे २०% वाटा इंधनाचा असतो. याचाच अर्थ असा की, प्रति ऑर्डर इंधनावर होणारा खर्च ₹९–१० इतका असतो.

सध्याच्या परिस्थितीत, इंधनाच्या दरात ४% वाढ झाल्यास, प्रति ऑर्डर ₹०.४४ इतका अतिरिक्त बोजा पडेल. जर इंधनाचे दर आणखी वाढले म्हणजेच प्रति लिटर ₹१० ने वाढ झाली तर या वाढीचा परिणाम प्रति ऑर्डर ₹१ ते ₹१.२ पर्यंत पोहोचू शकतो. जर वितरणाचा हा वाढीव खर्च ग्राहकांवर लादला गेला नाही, तर याचा कंपन्यांच्या कमाईवर ४% ते १२% पर्यंत परिणाम होण्याची शक्यता आहे.
Blinkit आणि Swiggy या दोन्ही कंपन्या अन्न वितरण आणि ‘क्विक कॉमर्स’ या क्षेत्रांवर अवलंबून आहेत. आर्थिक वर्ष २०२७ मध्ये, Eternal ला अंदाजे २.७ अब्ज ऑर्डर्स मिळतील असा अंदाज आहे, तर Swiggy ला १.४ अब्ज ऑर्डर्स मिळतील असा कयास आहे. याचा परिणाम Swiggy साठी अधिक महत्त्वपूर्ण ठरू शकतो; कारण सध्या ही कंपनी ‘क्विक कॉमर्स’ विभागात ‘ब्रेक-इव्हन’ म्हणजेच, ना नफा ना तोटा अशी स्थिती गाठण्याच्या मार्गावर आहे.

Eternal और Swiggy पर क्या असर?

दुसरीकडे, ‘Eternal’ ही कंपनी अधिक अनुकूल स्थितीत असल्याचे मानले जाते. तिचा मोठा विस्तार, जाहिरातींमधून मिळणारा अधिक महसूल आणि उच्च-दर्जाचा ग्राहक वर्ग यामुळे वाढता खर्च पेलणे तिला शक्य होईल. या अतिरिक्त खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपन्या विविध उपाययोजना करतील; त्यातील काही खर्च वाढीव शुल्काच्या स्वरूपात ग्राहकांवर टाकतील, काही खर्च स्वतः सोसतील आणि उर्वरित खर्च आपल्या delivery partners कमाईवर दबाव टाकून भरून काढतील.

ग्राहक आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्यांवरील परिणाम

वाढत्या खर्चामुळे ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’ मिळण्याची सुविधा ही ग्राहकांसाठी अधिक खर्चिक ठरू शकते. परिणामी, कंपन्या डिलिव्हरी शुल्क किंवा सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकतात. गिग वर्कर्स कमाईवर परिणाम होत असल्याने, ते कदाचित अधिक मोबदल्याची मागणी करतील; ज्याचा परिणाम पर्यायाने संपूर्ण कामकाजाच्या व्यवस्थेवर होईल.
पण ‘Elara Capital’ च्या मते, ही परिस्थिती काही कालावधीनंतर नियंत्रणात येईल. दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहता, कंपन्या आपल्या कामकाजाची कार्यक्षमता वाढवून, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून आणि उत्कृष्ट नियोजन धोरणांची अंमलबजाही करून या आव्हानाचा सामना करू शकतात. इंधनाच्या वाढत्या किमती हे आता ‘क्विक कॉमर्स’ उद्योगासमोरचे एक नवीन आव्हान म्हणून उभे राहिले आहे.

Meta Layoffs: पहाटेचा ईमेल 8000 लोकांची झोप उडवून गेला, Meta कडून एका झटक्यात मोठी नोकरकपात

Web Title: Petrol diesel price hike impact 10 minute quick commerce delivery gets costly marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Marathi News
  • quick commerce
  • Swiggy
  • Zomato
  • Zomato Delivery Boy

संबंधित बातम्या

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
1

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
2

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

Sukanya Samriddhi: सरकारी योजनेची कमाल, 1200 रुपयांची गुंतवणूक पण व्याजात मिळणार तब्बल 4.74 लाख
3

Sukanya Samriddhi: सरकारी योजनेची कमाल, 1200 रुपयांची गुंतवणूक पण व्याजात मिळणार तब्बल 4.74 लाख

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
4

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.