Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

PM Crop Insurance : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून वाढवून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 05:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
  • पीक विम्याची मुदत वाढवली
  • कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
PM Crop Insurance : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा ( PM Crop Insurance ) योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून वाढवून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नेमक काय म्हणाले कृषीमंत्री? आणि तुमच्या विभागाची आकडेवारी काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

GST E-Way Bill Rules : व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून लागू होणारे ई-वे बिलचे नवीन नियम तूर्तास टळले

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

“राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ वरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली” असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कोणत्या विभागातून किती प्रतिसाद?

राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार कोकण विभागातून १,०२,३३५, नाशिक विभागातून ३,३३,३८५, पुणे विभागातून ६,०७,६६३, कोल्हापूर विभागातून २,४०,२५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३,२५,०००, लातूर विभागातून २,४२,८२६, अमरावती विभागातून ६,९१,९७३ आणि नागपूर विभागातून ४,५३,३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. एकूण ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून, मराठवाडा विभागातून सर्वाधिक तर कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारी दिसून येते.

ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला नाही…

“पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी”, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची ठाम भूमिका आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अर्ज करता आलेला नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत कोणताही विलंब न करता १० ऑगस्टपूर्वी पीक विम्यासाठी अर्ज करावा.”

आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना

“प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट तसेच हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करत असून, सर्व शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ अर्ज करावा,” असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PMFBY Crop Insurance App डाउनलोड करावा किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा.

GST Collection Record: केंद्र सरकारची तिजोरी भरली! जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड्स; पाहा सरकारला किती झाला फायदा?

Web Title: Pm crop insurance scheme date extended august 10 dattatray bharne

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Business News
  • Crop Insurance
  • Farmer Issue
  • Marathi News

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.