2 बीएचके फ्लॅटचे भाडे 43000 रुपये, 2.5 लाख रुपये डिपॉझिट; ...लोक म्हणतायेत किडनी विकावी लागेल!
कोरोना काळात अनेक जण गावांकडे जात होते. तर अनेक नामांकित कंपन्यांनी त्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. ज्यामुळे ऑफिसेस, फ्लॅट ओस पडली होती. मात्र, आता काही वर्षांमध्ये दिल्ली, बंगळुरू आणि मुंबई या मेट्रो शहरांमध्ये भाड्याने उपलब्ध होणाऱ्या प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचाच एक भाग आता बंगळुरू या शहरात पाहायला मिळाला आहे.
महिलेची फ्लॅट भाड्याने देण्यासाठी पोस्ट
लिशा अग्रवाल नामक एक महिला बंगळुरू शहरातून कामानिमित्त बाहेरच्या शहरात राहण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तिने आपल्या मालकीचा २ बीएचके फ्लॅट भाड्याने देण्यासाठी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. तिचा हा फ्लॅट बंगळुरूच्या कोरामंगला या भागात असून, तो विप्रो कंपनीच्या अगदी जवळ आहे. या महिलेने आपल्या या फ्लॅटसाठी चौकशी सुरु केली असून, तिने आपल्या संबंधित २ बीएचके फ्लॅटचे मासिक ४३००० रुपये भाडे आणि 2.5 लाख रुपये डिपॉझिट घेणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा : मुकेश अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये नोकरांना किती मिळतो पगार? …मोजता-मोजता थकून जाल!
युजर म्हणतो, मला किडनी विकावी लागेल!
सध्या या महिलेची ही पोस्ट समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत असून, तिच्या या पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. या सर्वांमध्ये एका युजरने एकदम मजेशीर कमेंट केली आहे. त्याने आपल्या कमेंटमध्ये म्हटले आहे की, “घर तर चांगले आहे. मात्र, २.५ लाख रुपये डिपॉझिट खूपच जास्त आहे. हे डिपॉझिट भरण्यासाठी मला ब्लॅकने बाजारात किडनी विकावी लागेल.”
We are moving out of our current 2BHK in Koramangala and looking for someone who’d be interested in taking it up! Want someone who will be willing to take it as it is (with all the furnishings). Rent 43k, deposit 2.5L, all furniture additional costs. DM for details! pic.twitter.com/aUr5lwnMWF
— Leesha Agarwal (@Theleeshesh) August 1, 2024
काय प्रतिउत्तर दिलंय ‘या’ महिलेने?
यावर लिशा अग्रवाल यांनी म्हटले आहे की, मला माहितीये हा वेडपटपणा आहे. मात्र, बंगळुरू शहरात घर भाड्याने देताना हाच ट्रेंड सुरु आहे. मी मागील दोन वर्षांपासून बंगळुरूमध्ये राहत असून, या ठिकाणी घर भाड्याने देताना डिपॉझिट असेच गगनाला भिडले आहे. दरम्यान, अन्य एका युजरने याबाबत कमेंट करताना म्हटले आहे की, यात नवीन असे काही नाही. मी बंगळुरूच्या व्हाइटफील्ड भागामध्ये इतकेच डिपॉझिट दिले आहे. तर अन्य एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, सहा महिन्यांचे घर भाडे डिपॉझिट म्हणून द्यावे लागत असेल तर मी एखाद्या हॉटेलमध्ये राहणे पसंत करिन.
नोएडानंतर बंगळुरूमध्ये सर्वाधिक घरभाडे
प्रॉपर्टी कन्सलटन्ट कंपनी एनारॉकच्या अहवालानुसार, देशात दिल्ली येथील नोएडा भागानंतर रेंट आणि डिपॉझिटच्या बाबतीत बंगळुरू शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरूमध्ये घरभाडे ज्या ठिकाणी ८ टक्क्यांनी वाढले आहे. त्या तुलनेत चेन्नई ४ टक्के आणि हैद्राबादमध्ये ५ टक्क्यांनी वाढले आहे. देशातील सर्वच शहरांमध्ये भाड्याच्या घरांच्या मागणीत वाढ होत आहे.