Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Tex 2026 : कापड पुनर्वापरासाठी ReFiber चा पुढाकार; मुंबईत 2.7 टन कापड कचऱ्याचे यशस्वी संकलन, विशेष अहवाल सादर

भारतातील कापड कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी OterRi च्या सहकार्याने कार्यरत असलेल्या ReFiber ने 'भारत टेक्स २०२६' मध्ये एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर केला आहे. 'मुंबई टेक्सटाईल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट' अंतर्गत नवी मुंबईत राबवलेल्या उपक्रमात २५७ नागरिकांच्या सहभागाने तब्बल २.७ टन वापरलेले कापड संकलित करण्यात

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 20, 2026 | 01:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कापड कचऱ्यापासून रोजगार निर्मिती!
  • भारत टेक्समध्ये ReFiber, OterRi कडून उपक्रम
  • उपक्रमाचा सविस्तर अहवाल सादर
Bharat Tex 2026 : भारतातील वापरानंतर टाकून दिल्या जाणाऱ्या कापडाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने OterRi च्या सहकार्याने कार्यरत ReFiber ने भारत टेक्स २०२६ मध्ये ‘मुंबई टेक्सटाईल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट’ या उपक्रमाचा सविस्तर अहवाल सादर केला. CMAI आणि GATS यांच्या Eco Stitch Sustainability and Circularity Hub मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल जागतिक पर्यावरण दिन २०२६ रोजी सुरू झालेल्या ‘मुंबई टेक्सटाईल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट’ या उपक्रमावर आधारित आहे. OterRi, Tisser, CMAI, UNIDO, World Trade Center Mumbai आणि Lions International यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

Crude Oil च्या दरात मोठी वाढ! ब्रेंट क्रूड 90 डॉलर्सच्या पार पोहोचलं; आता भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेल महागणार?

वापरलेल्या कापडाचे प्रभावी संकलन

या उपक्रमातून २.७ टन वापरलेले कापड संकलित करण्यात आले. २५७ नागरिकांनी सहभाग घेत २७५ संकलन ऑर्डर्स दिल्या. १५ लॉन्ड्री भागीदारांच्या २८ शाखांमधून हे संकलन करण्यात आले. शहरातील उपलब्ध सेवा व्यवस्थेचा वापर करून वापरलेल्या कापडाचे प्रभावी संकलन करता येते, हे या उपक्रमातून सिद्ध झाले. या अहवालात भारतातील वस्त्र पुनर्वापर व्यवस्थेतील प्रमुख अडचणी आणि त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येणारे उपाय मांडण्यात आले आहेत. तसेच महिला बचत गट, अपसायकलिंग उद्योग आणि स्थानिक व्यवसायांना या उपक्रमातून कसा फायदा होऊ शकतो, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कापडाला पुन्हा उपयुक्त संसाधनात बदलासाठी

ReFiber Initiative चे अध्यक्ष श्रीकांत भांगडिया म्हणाले, “भारतातील वस्त्रोद्योग हा आपल्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. वापरानंतर टाकून दिलेल्या कापडाला पुन्हा उपयुक्त संसाधनात बदलण्यासाठी पारदर्शक, विश्वासार्ह आणि विस्तार करता येईल अशी व्यवस्था उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवी मुंबईतील या प्रकल्पातून तंत्रज्ञान, नागरिकांचा सहभाग आणि विविध संस्थांचे सहकार्य यांच्या मदतीने पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेला लाभ होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र आणि भारतासाठी शाश्वत वस्त्र व्यवस्थापनाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.”

सहकार्याच्या माध्यमातून वस्त्र पुनर्वापराचे प्रभावी मॉडेल

OterRi आणि ReFiber चे COO मनोज वानवरी म्हणाले, “मुंबई टेक्सटाईल सर्क्युलर इकॉनॉमी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. तंत्रज्ञान, डेटा आणि विविध संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून वस्त्र पुनर्वापराचे प्रभावी मॉडेल उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील काळात हे मॉडेल शहर, राज्य आणि देशभर विस्तारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. डिजिटल ट्रॅकिंग, संघटित संकलन व्यवस्था आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या मदतीने भारतातील वस्त्र कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाय उभा करता येईल.”

संपूर्ण देशात हा उपक्रम विस्तारण्याची योजना

भारत टेक्स २०२६ मध्ये हा अहवाल वस्त्रोद्योग मंत्रालय, UNIDO, CMAI, GATS तसेच विविध सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. नवी मुंबईतील या यशस्वी उपक्रमानंतर ReFiber आता मुंबई महानगर प्रदेश, महाराष्ट्र आणि पुढे संपूर्ण देशात हा उपक्रम विस्तारण्याची योजना आखत आहे. तंत्रज्ञान, डिजिटल ट्रॅकिंग आणि संघटित संकलन व्यवस्थेच्या मदतीने वापरलेल्या कापडाचा पुनर्वापर वाढवून शाश्वत भविष्य घडवण्याचा ReFiber चा प्रयत्न आहे.

8th Pay Commission मध्ये मोठा बदल! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते मोठी वाढ, जाणून घ्या नवीन अपडेट

Web Title: Refiber presents mumbai textile circular economy report at bharat tex 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Business News
  • digital
  • Marathi News
  • textile industry

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
3

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
4

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.