Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्च्या तेलाच्या व्यापारात मोठा गेम! भारताच्या मदतीने Russia ने खेळला मास्टरस्ट्रोक, अमेरिका-युरोप पाहतच राहिले…

अमेरिका आणि युरोपियन युनियन यांसारख्या पाश्चात्य देशांनी रशियन कच्च्या तेलावर कठोर बंदी घातली आहे. त्यामुळे रशियावरील दबाव वाढत आहे. पण असं असलं तरीही या कडक निर्बंध आणि बंदी असूनही, एक मोठी प्लॅनने रशिया गेम फिरवू शकतो. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या एका ताज्या अहवालात असे उघड झालंय.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 14, 2026 | 03:37 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:

Russian Oil Ban: अमेरिका आणि युरोपियन युनियन यांसारख्या पाश्चात्य देशांनी रशियन कच्च्या तेलावर कठोर बंदी घातली आहे. त्यामुळे रशियावरील दबाव वाढत आहे. पण असं असलं तरीही या कडक निर्बंध आणि बंदी असूनही, एक मोठी प्लॅनने रशिया गेम फिरवू शकतो. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या एका ताज्या अहवालात असे उघड झालंय की, निर्बंध लादलेल्या देशांना थेट विक्री करता येत नसतानाही, रशियन तेलावर इतर देशांतील रिफायनरींमार्फत प्रक्रिया करून ते त्यांच्या बाजारपेठेत परत आणता येणार आहे. म्हणजे नेमकं काय समजून घेऊयात.

संपूर्ण जगाचं आज अमेरिका-इराण कराराकडे लक्ष, Hormuz मार्ग खुला झाला तर कोणत्या देशांना लागणार लॉटरी?

भारताकडूनही हातभार

मे २०२६ मध्ये, भारत, तुर्की, ब्रुनेई आणि जॉर्जिया यांसारख्या देशांनी रशियन कच्च्या तेलावर प्रक्रिया करून, रशियावर कठोर निर्बंध लादलेल्या देशांना मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली. अमेरिका आणि युरोपियन युनियन यांसारख्या पाश्चात्य देशांना पेट्रोलियम उत्पादने विकण्याच्या रशियाच्या प्रयत्नांना भारतानेही हातभार लावला.

₹७,०५२ कोटींची विक्री

CREA च्या अहवालानुसार, भारतासह चार देशांमधील रिफायनरींनी मे २०२६ मध्ये एकूण €६४१ दशलक्ष म्हणजेच अंदाजे ₹७,०५२ कोटी किमतीची तेल उत्पादने थेट निर्बंध असलेल्या देशांना निर्यात केली. विशेष म्हणजे, या एकूण निर्यातीपैकी, अंदाजे €२१४ दशलक्ष किमतीची उत्पादने थेट रशियन कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून तयार करण्यात आली होती.

बंदी घालणाऱ्या या देशांनी खरेदी केली:

ऑस्ट्रेलिया: २७५ दशलक्ष युरो किमतीचे तेल आयात केले.
युरोपियन युनियन: स्वतःचे निर्बंध लादलेले असूनही, १७४ दशलक्ष युरो किमतीची तेल उत्पादने खरेदी केली.
अमेरिका: १४७ दशलक्ष युरो किमतीची शुद्ध पेट्रोलियम उत्पादने आयात केली.
न्यूझीलंड: ४५ दशलक्ष युरो किमतीची उत्पादने आयात केली.

रिलायन्सच्या रिफायनरीचीही भूमिका

अहवालात थेट त्या रिफायनरींचा उल्लेख आहे, जिथून शुद्ध तेल उत्पादने अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या देशांमध्ये परत पाठवली जात आहेत. अहवालानुसार, अमेरिकेला होणारी बहुतांश निर्यात भारतातील गुजरात येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरी, तुर्कीच्या स्टार रिफायनरी आणि तुप्रास इझमिट रिफायनरीमधून झाली. आकडेवारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत तुर्कीच्या स्टार रिफायनरीच्या एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी ३९ टक्के पुरवठा रशियाकडून झाला होता. त्याच वेळी, भारताच्या विशाल ‘जामनगर रिफायनरी’चा १५ टक्के फीडस्टॉक रशियन कच्च्या तेलावर आधारित होता.

Anil Ambani च्या अडचणीत वाढ! आधी अटक… आता कंपनीच्या माजी MD ची रवानगी पोलिस कोठडीत; काय नेमकं प्रकरण?

Web Title: Russia plays masterstroke with india help crude oil sanctions loophole see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Business News
  • crude oil
  • Crude Oil Prices
  • Marathi News
  • Oil Crisis
  • Russian

संबंधित बातम्या

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
1

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?
2

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?
4

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.