रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia to aid India Sudarshan Chakra : भारत-रशिया यांचे संबंध दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालले आहेत. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाने पुन्हा एकदा भारताच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश दिला आहे. मंगळवारी रशियाच्या वरिष्ठ राजनयिक रोमन बाबुश्किन यांनी म्हटले की, “जर पाश्चात्य देश तुमच्यावर टीका करत असतील, तर याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहात.”
बाबुश्किन म्हणाले, “रशियन शस्त्रे ही भारतासाठी नैसर्गिक निवड आहेत. आम्ही संरक्षण क्षेत्रातील विश्वासू भागीदार आहोत आणि भारताच्या कोणत्याही प्रयत्नांना पाठिंबा देण्यास सदैव तयार आहोत.” त्यांनी अमेरिकेने तेल खरेदीवर लादलेल्या शुल्कांवरही कठोर टीका केली. उलट, भारतीय वस्तूंना जर जागतिक बाजारपेठेत अडचणी आल्या, तर रशियन बाजारपेठ भारतासाठी सदैव खुली राहील, असा दिलासा त्यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
जेव्हा रशियन राजनयिकांना भारताच्या आयर्न डोमबाबत प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी हसतच प्रत्युत्तर दिले “तुम्हाला आयर्न डोम म्हणायचं आहे की ‘सुदर्शन चक्र’?” त्यांच्या या विधानाचा थेट संबंध भारतीय हवाई दलाच्या S-400 युनिटशी आहे, ज्याचे नाव ‘सुदर्शन चक्र’ ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून “मिशन सुदर्शन चक्र” ची घोषणा करताना देशातील सर्व महत्त्वाची शहरे हवाई संरक्षण प्रणालीने जोडली जातील असे स्पष्ट केले होते.
रशियाचा S-400 प्लॅटफॉर्म ४०० किमी अंतरावरून विमानं, क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि बॅलिस्टिक मिसाईल्स पाडण्याची ताकद ठेवतो.
त्याच्या तुलनेत अमेरिकेची THAAD प्रणाली केवळ २०० किमीच्या श्रेणीतच प्रभावी आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने “सुदर्शन चक्र” हे अधिक व्यापक ढाल ठरणार असल्याचे रशियन दूतांनी सुचवले.
याच वेळी भारतही स्वदेशी लाँग रेंज सरफेस-टू-एअर मिसाईल (LR-SAM) प्रणाली ‘प्रोजेक्ट कुशा’ वर काम करत आहे.
ही तीन टप्प्यांत विकसित होणार आहे :
M1 – १५० किमी श्रेणी
M2 – २५० किमी श्रेणी
M3 – ४०० किमी श्रेणी
या प्रणालीची चाचणी २०२५ च्या अखेरीस सुरू होईल, तर २०२८ ते २०३० दरम्यान ती भारतीय लष्करात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकत्याच झालेल्या फोन कॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेनस्थितीबद्दल माहिती दिली होती. बाबुश्किन म्हणाले,
“हा फोन कॉल दाखवतो की भारत आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. आम्ही परस्पर समाधानासाठी कोणताही उपाय शोधू शकतो.” स्पष्टच आहे की, अमेरिकेच्या धमक्या, शुल्के आणि दबाव यांना झुगारून रशिया भारताच्या सुरक्षेत व ऊर्जा क्षेत्रात ठामपणे सोबत उभा आहे. ‘सुदर्शन चक्र’ या प्रतीकातून भारताची सुरक्षा ढाल आता आणखी मजबूत होत असल्याचे संकेत आहेत