अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा शेअर 99 टक्के घसरुन सावरला; 5 वर्षात गुंतवणूकदार मालामाल!
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स गेल्या पाच दिवसांपासून रॉकेट वेगाने वाढत आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टरचे शेअर पाच दिवसांत 13 टक्क्यांनी वधारले आहेत. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी हा शेअर त्याच्या उच्च पातळीपासून 99 टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. मात्र, आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टच्या शेअरने पुन्हा वेग घेतला असून, बुधवारी (ता.30) त्याची किंमत पुन्हा एकदा 200 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे.
रिलायन्स इन्फ्राच्या शेअरमध्ये मोठी उसळी
मंगळवारी (ता.३०) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टरच्या शेअरने बाजार उघडताच 200 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. आणि तो सुमारे 3 टक्क्यांनी वाढून 205.60 रुपयांवर पोहोचला. पण पुढे त्याचा वेग मंदावला बाजार बंद होईपर्यंत तो रु. 200.75 च्या पातळीवर बंद झाला. यानंतर आज बुधवारी (ता.३१) रिलायन्स इन्फ्रा शेअरने जोरदार वाढ नोंदवली. दिवसभरातील ट्रेडिंगदरम्यान हा शेअर 3.66 टक्क्यांच्या वाढीसह 209 रुपयांवर पोहोचला. मात्र, बाजार बंद होईपर्यंत तो 2.85 टक्क्यांच्या घसरणीसह पुन्हा 207 रुपयांवर खाली आला.
हेही वाचा : ८ वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत स्पष्टच सांगितले… वाचा सविस्तर!
कंपनीचे मार्केट कॅप 8,200 कोटी रुपयांवर
रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅपदेखील 8,200 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसात या शेअरची किंमत 12.64 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, हा शेअर 200 रुपयांच्या पुढे जाण्याची अपेक्षा शेअर बाजारातील तज्ज्ञांना आधीच व्यक्त केली होती.
विशेष म्हणजे या शेअरमध्ये तब्बल 99 टक्क्यांची घसरण झाली होती. परंतु, या शेअरने दमदार पुनरागमन केले आहे. दरम्यान, 4 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स इन्फ्राच्या शेअरची किंमत 2514.35 रुपये होती. जी 10 जानेवारी 2020 रोजी हा जवळपास 99 टक्के घसरुन 24.90 रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर त्यात हळूहळू वाढ झाली आणि आज या शेअरने 200 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
हेही वाचा : इन्फोसिसच्या अडचणीत वाढ; कंपनीला मिळाली 32,000 कोटींच्या जीएसटी चोरीची नोटीस!
गुंतवणूकदारांना तब्बल 306.49 टक्के परतावा
अनिल अंबानींच्या या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत तब्बल 306.49 टक्के परतावा मिळाला आहे. 2 ऑगस्ट 2019 रोजी शेअरची किंमत 50 रुपये होती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आजपर्यंत ठेवले असतील, तर त्याची 1 लाख रुपयांची रक्कम आता वाढून 4 लाख रुपये झाली आहे.